आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसूल केलेली वाढीव पाणीपट्टी उद्याेगांना परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वीजदर वाढले म्हणून पाणीदरही वाढवावे लागत असल्याचे कारण देत २० टक्क्यांपर्यंत वाढविलेले पाणीपट्टीचे दर एमअायडीसीने कमी केले अाहेत. विशेष म्हणजे, वीजदर कमी झाल्यानंतर पाणीपट्टीचेही दर कमी व्हावेत, यासाठीची मागणी उद्याेजक वारंवार करीत हाेते ती रास्त असल्याने एमअायडीसीने हे दरही कमी केले असून, वसूल केलेल्या वाढीव रकमेची वजावट येणाऱ्या बिलांमधून उद्याेजकांना मिळणार अाहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने केलेली विजेची दरवाढ मागे घेतली असल्याने १३ नाेव्हेंबर २०१३ अन्वये केलेली पाणीपुरवठ्याची दरवाढही महाराष्ट्र अाैद्याेगिक िवकास महामंडळाने डिसेंबर महिन्यातच मागे घेतली अाहे. डिसेंबर २०१३ पासून हे दर कायम राहतील, असे महामंडळाने स्पष्ट केले असून, १३ नाेव्हेंबर २०१३ अन्वये पाणीपुरवठ्याची दरवाढ मागे घेण्यात अाली अाहे. ज्या ग्राहकांनी १३ नाेव्हेंबर २०१३ प्रमाणे पाण्याची देयके अदा केलेली असतील, त्यांची देयके डिसेंबर २०१३ पासून परिपत्रक क्रमांक ६, दिनांक फेब्रुवारी २०१३ प्रमाणे सुधारित करण्यात येऊन अाणि दाेन्ही परिपत्रकांप्रमाणे येणारी फरकाची रक्कम समायाेजित करण्यात येणार अाहे. मात्र, हा परतावा देताना वसूल केलेल्या रकमेवर काेणतेच व्याज दिले जाणार नाही.

या उद्याेगांना लाभ नाही
पाणीहा कच्चा माल म्हणून वापरला जात असेल तर पाणीपुरवठ्याचे दर परिपत्रक क्रमांक ३५, िदनांक अाॅक्टाेबर २०११ परिपत्रक क्रमांक ४२, िदनांक १६ नाेव्हेंबर २०११ नुसार कायम राहणार अाहेत.

हजाराे उद्याेगांना फायदा
शहरातील सातपूर अाणि अंबड अाैद्योगिक वसाहतींत ४४०० च्या अासपास उद्याेग असून, या परिपत्रकाचा फायदा हजाराे उद्याेगांना थाेड्याबहुत प्रमाणावर त्यांच्या पाणी वापराप्रमाणे हाेणार अाहे. प्लेटिंग, काेटिंग उद्याेगांकरिता पाण्याचा वापर माेठ्या प्रमाणावर हाेत असताे. या उद्याेगांनाही या परिपत्रकाचा माेठा फायदा हाेणार अाहे.