आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी नाशकात नविन शहर, अखाड्यांसाठी अलिशान बिल्डिंग तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधुग्राममध्ये अखाड्यांसाठी बनत असलेला लग्झरी टेंट... - Divya Marathi
साधुग्राममध्ये अखाड्यांसाठी बनत असलेला लग्झरी टेंट...
नाशिक- नासिक कुंभमेळ्याची आजपासून सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पूजा करून त्याचे अधिकृत उद्घाटन झाले. 25 सप्टेंबरपर्यंत चालणा-या या मेळाव्यात अडीच महिन्यात सुमारे 4 कोटी लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
कुंभमेळ्यासाठी नाशकात येणा-या या लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने साधुग्राम नावाचे एक छोटेसे नविन शहरच वसविले आहे. हे शहर 714 एकरात पसरले आहे. यात सर्व 13 अखाड्यांसाठी अलिशान बिल्डिंग बनविली जात आहे. तसेच 25 हजार गॅस कनेक्शन, 39 हजार शौचालय आणि 20 ठिकाणी पार्किंगची सुविधा असेल.
550 सीसीटीव्ही, 15 हजार जवान आणि 20 हजार वालंटियर्स सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. येथे एयर कंडिशन्ड टेंट, हॉटेल आणि कॅंप बुकिंग ऑनलाईन करू शकता. तीन शाही स्नानादरम्यान येणा-या लाखो भाविकांसाठी येथे पायाभूत सुविधाची उभारणी केली आहे. तसेच विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, साधुग्रामचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...