आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील मुख्य चौक देणार वाहतूक नियमांचे धडे, लाेकप्रतिनिधी घेणार वाहतूक बेट दत्तक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातीलबिघडलेल्या वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी आता शहरातील मुख्य चौक वाहतूक नियमांचे धडे देणार आहेत. पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेतून लोकप्रतिनिधींनी पोलिस आयुक्तांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील एक-एक चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

वाहतूक िनयोजनासाठी वाहतूक विभागाकडून शहरात प्रभावी नियोजन केले जाते, असे असले तरी शहरात बहुतांशी वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होतांना निदर्शनास येते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी खासगी वाहनातून शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये अनेक त्रुटी अाढळून आल्या. बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्याचे पोलिस प्रशासनाचे एकट्याचे काम नसल्याने आयुक्तांनी वाहतूक परिषदेचे आयोजन केले. यामध्ये शहरातील नागरिकांसह, रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहतूकदारांसह लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत वाहतुकीसंदर्भात सूचनांचा पाऊस पडला होता. लोकप्रतिनिधींनी आयुक्तांनी किमान एक चौक दत्तक घेत येथे वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींना केले होते. पोलिस आयुक्तालयातील बैठकीत नगरसेवक विलास शिंदे, सतीश सोनवणे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, सलीम शेख, विक्रांत मते, अरविंद शेळके, गोकुळ पिंगळे यांनी शहरातील मुख्य चौक दत्तक घेत तो चौक वाहतूक नियमन बेट म्हणून सुशोभीत करण्याचे अाश्वासन दिले.

या बेटांचा केला जाणार विकास
जेहानसर्कल, एबीबी सर्कल, विद्याविकास सर्कल, सावरकरनगर, महात्मानगर, रविवार कारंजा हे प्रमुख चौक आता वाहतूक बेट म्हणून विकसित होणार अाहे. चौकावर झेब्रा पट्टे, पार्किंगसाठी साइडपट्टे, दुभाजक, सूचना फलक, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि स्प्रींग बोलाड लावण्यात येणार आहेत.

सर्वांचे सहकार्य आवश्यक
^वाहतूकव्यवस्थेलाशिस्त लावण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांना वाहतूक बेट म्हणून सुशोभीत करण्यात येणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. या प्रकारे सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास वाहतुकीस शिस्त लागेल. शहराचा नावलौकिक वाढेल.
- डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त


बातम्या आणखी आहेत...