आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढीवरून नाशिक महापालिकेत रणकंदन, विरोधकांकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरपट्टीत १८ टक्के, तर पाणीपट्टीत तब्बल पाच वर्षे १२० टक्के वाढ करण्याच्या स्थायी समितीच्या प्रस्तावाला महासभेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुरू केलेल्या विराेधाचे रूपांतर अभूतपूर्व गाेंधळात झाले. विराेधकांनी महापाैरांसमाेरील वेलमध्ये बसकण मारत ‘नहीं चलेगी नही ंचलेगी, दादागिरी नहीं चलेगी’ अशा घाेेषणा देत भाजपचा निषेध सुरू केला. महापाैर रंजना भानसी यांनी करवाढीचा प्रस्ताव या महासभेत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेभान झालेल्या विराेधकांनी थेट महापाैरांच्या अधिकाराचे प्रतीक मानला जाणारा राजदंडच पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप विरुद्ध विराेधक असा संघर्ष वाढून अखेर सर्व विषय मंजूर करीत महापाैरांनी महासभा गुंडाळली. दरम्यान, वंदे मातरम हे राष्ट्रगीत सुरू असतानाही विराेधकांबराेबरच भाजपचे काही नगरसेवक गाेंधळ घालत हाेते.  
 
शनिवारी दुपारी २ वाजता नाशिक  महापालिकेची महासभा सुरू झाल्यानंतर शिवसेनेसह विराेधकांनी घरपट्टी व पाणीपट्टीतील करवाढीला विराेध सुरू केला. गळ्यात काळे रुमाल, काळे कपडे, काळ्या टाेप्या घालून विराेधाच्या तयारीनिशी अालेल्या विराेधकांनी करवाढीबाबत महापाैरांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी नाशिककरांवर करवाढीचा बाेजा लादण्याचे कारण काय? याचा खुलासा करण्याचा अाग्रह केला. त्यावर महापाैरांनी या महासभेत करवाढीचा प्रस्ताव नसून जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र, विराेधकांनी या विषयावर अाताच स्पष्टीकरण दिले पाहिजे, असा अाग्रह धरला. दुसरीकडे, भाजपच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेनुसार कामकाज सुरू करावे, अशी मागणी सुरू केली. त्यामुळे विराेधकांनी अाणखीच अाक्रमक पवित्रा घेतला.   
 
सेनेचे भाजपवर ‘साेनू अस्त्र’   
शिवसेनेचे नगरसेवक संताेष साळवे यांनी भाजपवर ‘साेनू अस्त्र’ साेडले. त्यामुळे भाजपचे नगरसेवक अाणखीच चिडले. ‘साेनू तुझा भाजपवर भरवसा नाय काय? अायुक्तांचे डाॅकेट कसे गाेलगाेल... करवाढीत सर्व झाेलझाेल... भ्रष्टाचार जाताे खाेलखाेल...’ असे म्हणत विडंबन केले.
 
बातम्या आणखी आहेत...