आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या रात्री वाजेपर्यंत भरा पेट्रोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील पेट्रोलपंप शनिवारी (दि. ११) सकाळी ते रात्री वाजेपर्यंत सुरू राहतील. या काळात महामार्गालगतचे पेट्रोलपंप बंद राहतील, तर महामार्गालगतचे पेट्रोलपंप रात्री ते सकाळी वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. पंपचालकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. ११) हे खरेदी बंद आंदोलन छेडले जाणार आहे, याचा फटका वाहनधारकांना बसणार आहे.

राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम डिलर्स संघटनेच्या आदेशानुसार राज्यातील पेट्रोल डिलर्सच्या 'फामपेडा' या संघटनेशी संलग्न ४५०० वितरक या बंदमध्ये सहभागी होणार असून, जिल्ह्यातील ४५० पंप यामुळे एकाच पाळीत कार्यरत राहतील, ज्याचा फटका जिल्हावासीयांना सहन करावा लागणार आहे.

पंप चालकांच्या विविध मागण्यांसाठी शासन ऑइल कंपन्या यांच्याकडे पाठपुरावा केला असता एकमेकांकडे बोट दाखविले जाते टाळाटाळ केली जाते. त्यामुळे नियंत्रणमुक्त बाजारपेठेत स्पर्धा करणे वितरकांना कठीण झाल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केली आहे. आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाहीच, तर १७ आणि १८ एप्रलि रोजी खरेदी करणार नाही आणि एकाच पाळीत पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत, यानंतर मात्र १७ एप्रलिपासून बेमुदत खरेदी बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

डिलर्सच्या मागण्या :
वितरकांचा नफा ठरविताना सन १९९७ च्या नेट फिक्स अॅसेटचा आधार घेतला आहे तो अद्यावत करावा, डिझेलची बेकायदेशीर विक्री बंद करावी, पंपावर येणारा स्टॉक हा फ्लो मीटरने ताब्यात मिळावा, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. बैठकीला अध्यक्ष शंकरराव टाकेकर, उमेश चांडक, विनय पालेजा, विकी कपूर, तेहसीन खान उपस्थित होते.

या पंपांवर सेवा उपलब्ध
रिलायन्स आणि एस्सार कंपनीचे पंप या आंदोलनात सहभागी नसल्याने येथील सेवा नियमित असेल. रिलायन्सचे शहरात पाइप लाइनरोड आणि दिंडोरीरोडला, तर एस्सारचे महात्मा नगर, औरंगाबादरोड आणि दिंडोरीरोडवर पेट्रोलपंप आहेत.

बैठकीत निर्णय
११एप्रिलला एक पाळीत सेवा देण्याबाबत आमच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, तो जिल्ह्यातील वितरक काटेकोरपणे पाळणार आहोत.
विजय ठाकरे,
सचिव, नाशिक डिस्ट्रकि्ट पेट्रोल डिलर्स वेल्फेअर्स असाेसिएशन

पुढील स्लाईडवर पाहा, अशी आहे शहराची स्थिती