आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइक अपघातात धडापासून शिर वेगळे झालेच कसे; पोलिसाच्या अपघाताची होणार सखोल चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिन्नर येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेले रमेश साळी यांचा मृतदेह शनिवारी दोन तुकड्यांमध्ये पडला होता. नागरिकांनी प्रसंगावधान बाळगून शिर आणि धडावर झाडाच्या फांद्या ठेवून ते झाकून ठेवले. ही घटना दोन बाइक्समध्ये झालेल्या धडकेने घडली अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, बाइकची धडक लागल्यानंतर शिर धडापासून वेगळा झालाच कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
 
 
19 जुलैपासून होते रजेवर
- नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक रमेश साळी 19 जुलैपासून आजारपणाच्या कारणास्तव सुट्टीवर होते. शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह टाकळीरोड येथील निर्जन ठिकाणी छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला.
- बघ्यांपैकीच काहींनी झाडाच्या फांद्या तोडून त्यांचा तुकडे झालेला मृतदेह झाकला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. 
 
 
घातपाताचा संशय...
- पोलिस हवालदार ते उप-निरीक्षक झालेले साळी यांनी नाशिक शहरासह कळवण येथेही सेवा दिली. केवळ बाइक अपघातामुळे त्यांचे तुकडे झालेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
- कथित अपघात ज्या ठिकाणी घडला, तेथे जास्त वर्दळ नाही. निर्जन रस्त्यावर कुणी घातपात तर केला नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. अपघातासोबतच त्यांच्या घातपाताचा संभावित कट आहे का या हेतूने सुद्धा सविस्तर तपास केला जात आहे. 
- दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार साळी यांच्या बाइकचा अपघात ज्या दुसऱ्या बाइकशी झाला त्या बाइक चालकाचा सुद्धा कसून शोध घेतला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...