आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेचे पॅनल अस्त्र, मातब्बरांची माेट बांधण्याचे प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातीलदहा महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनेने दिल्यानंतर अाता स्थानिक पातळीवर प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपला राेखण्यासाठी मातब्बरांचे पॅनल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला अाहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील महत्त्वाचे माेहरे गळाला लावण्यास सुरुवात केली असून, भाजपचा प्रयत्न लाटेवर स्वार हाेण्याचा असताना शिवसेनेने पॅनल अस्त्र वापरून चेहऱ्यावर निवडणूक जिंकून येण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चित्र अाहे.

महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली अाहे. केंद्र राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता असून, सध्या याच दाेन्ही पक्षांचा दबदबा सर्वत्र अाहे. स्थानिक पातळीवरही त्याचेच पडसाद उमटत असून, महापालिका निवडणुकीसाठी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून मातब्बर शिवसेना भाजपत प्रवेश करीत अाहेत. या दाेन्ही पक्षांची उमेदवारी मिळाली, तर विजयाचे गणित असा त्यामागचा विचार अाहे. प्रामुख्याने नाशिककरांची मानसिकता लाटेला प्रतिसाद देण्याची असल्यामुळे गेल्या वेळी मनसेला साथ देणारे मतदार यंदा शिवसेना भाजपला पसंती दाखवतील असा हाेरा अाहे. लाेकसभा विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती अाल्यामुळे युतीच्या माध्यमातून स्वत:चे अासन टिकवण्याची धडपड अाहे.

दुसरीकडे,मातब्बरांना सामावून घेता घेता शिवसेना भाजपत स्पर्धा सुरू झाली अाहे. चार सदस्यीय प्रभाग म्हणजे मिनी विधानसभा मतदारसंघ ठरणार असून, त्या माध्यमातून पक्षीय लाटेवर निवडणूक नेण्याचा भाजपचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. वाॅर्डपद्धतीत पक्षापेक्षा चेहऱ्याला महत्त्व असल्यामुळे भाजपने मिनी विधानसभा मतदारसंघाची चाल खेळल्याचेही बाेलले जाते. एकीकडे, भाजपकडून पक्षीय लाटेवर स्वार हाेण्याचा प्रयत्न असताना शिवसेनेने पक्षाबराेबरच पॅनल सक्षमीकरणावरही भर दिल्याचे चित्र अाहे. त्यामुळेच शिवसेनेचे पॅनल अधिकाधिक वजनदार व्यक्तींचे कसे असेल या दृष्टीने व्यूहरचना अाखली जात अाहे. खासकरून, राष्ट्रवादी मनसेतील महत्त्वाचे माेहरे गळाला लावण्याची शिवसेनेची नीती असून, त्यात शक्य तेथे विद्यमान नगरसेवकाला किंवा एखाद्या ठिकाणी दाेन दिग्गज असतील, तर तुलनेत कमी प्रभाव असलेल्या कुटुंबातील अन्य सदस्याला चाल देण्याचा प्रयत्न केला जात अाहे. पक्षीय लाटेबराेबरच उमेदवारांचे चेहरे महत्त्वाचे ठरणार असून, पॅनलमध्ये किमान दाेन मातब्बर असतील, तर अन्य दाेघा कच्च्या वा नवख्या भिडूचीही ते नैया पार करू शकतील अशा पद्धतीने नियाेजन सुरू अाहे.

मनसे, राष्ट्रवादीला पुन्हा धक्का
शिवसेनेकडूनखासकरून मनसे राष्ट्रवादीला धक्का देण्याचा प्रयत्न अाहे. यापूर्वी मनसेचे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते शिवसेनेत अाले अाहेत. अाता निवडणुकीच्या ताेंडावर पुन्हा काही पदाधिकारी शिवसेनेत जातील, असे सांगितले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...