आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकचा ‘पुष्कराज’ जर्मनीत झळाळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - संगीताला देशाच्या सीमा रोखू शकत नाहीत, उलट तर दोन धृवावरील माणसांना ते जवळ आणू शकते. त्याचा अनुभव नाशिकच्या पुष्कराज भागवत या युवा गायकाला आला. खास जर्मनीच्या वकिलातीतून त्याला कॉन्सर्टसाठी निमंत्रण आले असून, तिथे सुमारे वीस मैफलींमध्ये त्याला शास्त्रीय संगीत सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

नाशिकमध्ये पंधरा वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने जयपूर - ग्वाल्हेर - आग्रा घराण्याचे गायक पंडित डॉ. राम देशपांडे यांच्याकडे चार वर्षे संगीताचा अभ्यास केला. यादरम्यान त्याला गतवर्षी अनोखी संधी चालून आली. जर्मन-इंडियन कल्चरल एक्स्चेंजअंतर्गत त्याला जर्मनीत काही शहरांमध्ये शास्त्रीय संगीत आणि गझलच्या काही मैफलींमध्ये त्याची गायनकला दाखविण्याची संधी त्याला मिळाली. त्याच्या या मैफलींना स्थानिकांकडून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे तसेच तेथील नागरिकांच्या मागणीस्तव पुष्कराजला पुन्हा जर्मन वकिलातीकडून निमंत्रण देण्यात आले आहे.

रागाचा भाव समजतो : रागदारीतील शब्द जर्मन नागरिकांना समजत नसले, तरी त्याचा भाव त्यांना बराचसा उमगतो. तेथील अनेक जण शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा प्रदर्शित करतात. विशेषत: ओमकाराचा उच्चार तर त्यांना प्रचंड भावतो, असेही पुष्कराजने सांगितले. काही वेळा तर एखादी बंदिश सुरूअसताना काही जणांना रडू आल्याचे मी बघितले. त्यावर मी त्यांना विचारलेदेखील की कशामुळे रडू आले? त्यावर साधारणपणे त्यांची प्रतिक्रिया ‘आय डोन्ट नो, बट आय वॉज लॉस्ट’ अशा स्वरूपाची भावना व्यक्त केल्याचे पुष्कराजने नमूद केले.
जर्मनीसह स्वीडन आणि डेन्मार्कलाही जाणार
या वेळच्या दौर्‍यात पुष्कराज जर्मनीसह स्वीडन आणि डेन्मार्कलाही जाणार असून, तिथेदेखील शास्त्रीय संगीताच्या मैफलीत कलेचे सादरीकरण करणार आहे. तेथील बहुतांश मैफली या थीमआधारित असल्याने त्या स्वरूपाच्या रागातील बंदिशीच सादर केल्या जातात. तेथील नागरिक प्रचंड शिस्तप्रिय असल्याने ते पूर्णवेळ बसून शास्त्रीय संगीतातील बाबी समजून घेत असल्याचा अनुभव पुष्कराजला पहिल्या दौर्‍यात आला.