आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasik Road Tree Transfer To Other Place News In Nasik

विविध २५० धाेकादायक झाडांचे होणार पुनर्रोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरवासीयांसाठी सद्यस्थितीत धाेकादायक ठरणारी झाडे हटविण्याचे महत्त्वपूर्ण काम महापालिका प्रशासनाने सुरू केले अाहे. त्या अंतर्गत रविशंकर मार्गावरील २४ झाडांचे पुनर्राेपण झाल्यानंतर अाता शहरातील ठिकठिकाणच्या तब्बल २५० झाडांचे पुनर्राेपण करण्याचे काम हाती घेण्यात येणार अाहे. येत्या दाेन दिवसांत गंगापूरराेडवरील ४२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार अाहे. त्यानंतर प्राधान्यक्रमाने धाेकादायक झाडे ताेडण्यास सुरुवात हाेईल.

जेहान सर्कल ते गंगापूरराेड या भागात तब्बल ३२० झाडे रस्त्यात अाणि रस्त्याच्या जवळपास अाहेत. त्यात वड, पिंपळ अाणि नांद्रुक या झाडांसह रस्त्याच्या बाजूची झाडे वगळता सुमारे २०० झाडे ताेडण्यायाेग्य अाहेत. या झाडांमुळेच अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचा अाजवरचा अनुभव अाहे. गेल्या चार वर्षांत सहा जणांना या परिसरात झालेल्या अपघातांत जीव गमवावा लागला अाहे, तर ५० पेक्षा अधिक वाहनचालक या झाडांमुळे जखमी झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर गंगापूरराेडवरील ४२ झाडांचे पुनर्रोपण येत्या दाेन दिवसांत पालिकेतर्फे करण्यात येणार अाहे.

पेठरोडमार्गे नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महापालिकेने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी तारवालानगर ते अमृृतधाम चौफुली ते पुढे टाकळीरोडपर्यंत चारपदरी रिंगरोड तयार केला. हाच रस्ता तारवालानगरपासून पुढे दिंडोरीरोडमार्गे (मार्केट यार्डजवळून) थेट मखमलाबाद रस्त्याला जाऊन मिळतो. त्यामुळे मखमलाबाद, दिंडोरीरोड, पेठरोडवरून मालेगाव, औरंगाबाद अथवा थेट नाशिकरोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत जवळचा आणि कमी वर्दळीचा ठरत आहे. रिंगरोड तयार करण्यामागील महापालिकेचा हेतू साध्य झाला असला तरीही रस्त्यातील वृक्षांचा मुद्दा मात्र आता या हेतूलाच बाधा ठरतो आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांमुळे सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरतो आहे.
काही महिन्यांपूर्वी अशाच एका घटनेत एक कार थेट रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन पडली होती. अमृतधाम चौफुलीवरही अपघातांची मालिका थांबत नसताना आता रस्त्यातील ही झाडे म्हणजे वाहनचालकांसाठी जीवघेणे आव्हान ठरत आहे.

या परिसरात तीन झाडांचे पुनर्रोपण तातडीने करण्यात येणार असून, त्यानंतर अतिधाेकेदायक ठरणाऱ्या झाडांना हटविण्यात येणार अाहे. तिडके काॅलनीपासून गाेविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यातीलही काही झाडे पुनर्रोपित करण्यात येणार अाहेत.

ही झाडे लहान-मोठ्या अपघातांचे कारण बनत असल्यामुळे निर्णय झाला.
- मुंबई नाका ते सीबीएस यामार्गे अशाेकस्तंभ परिसर
- ितडके काॅलनी ते गाेविंदनगर
- जेहान सर्कल ते बारदान फाटा
- कलानगर ते पाथर्डी गाव
- पेठराेड ते राऊ हाॅटेल चाैक
- अाैरंगाबादराेड ते लक्ष्मीनारायण पूल
- अाैरंगाबादराेड ते टाकळी एसटीपी (सायखेडाराेड परिसर)
- नांदूर नाका ते हाॅटेल जत्रा
- दिंडाेरीराेड ते मखमलाबादराेड
- कॅनाॅल राेड जंक्शन ते विजय-ममता थिएटर
- पपया नर्सरी ते गरवारे पाॅइंट