आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करा - डॉ. पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- क्रीडाक्षेत्रात करिअर करण्यास चांगला वाव असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करायला हवे. जिद्द, चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवले पाहिजे. सातत्यपूर्वक प्रयत्न केले तर यशाचे उत्तुंग शिखर नक्की गाठता येईल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण बहिःशाल विभागाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले.

मुक्त विद्यापीठाचा विभागीय क्रीडा महोत्सव नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा महोत्सवाचे उद‌्घाटन सकाळी डॉ. विजया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा संचालक राजेंद्र तेलोरे, विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे, कक्ष अधिकारी मधुकर धात्रक, सहायक कक्ष अधिकारी परेश कदम उपस्थित होते. विभागीय केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी यावेळी सर्व स्पर्धकांना खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या ललिता बाबर आणि धावपटू कविता राऊत यादेखील मुक्त विद्यापीठाच्याच विद्यार्थिनी असून, त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव टी. के. सोनवणे यांनी केले. सर्व क्रीडा स्पर्धांचे पंच म्हणून विक्रम सातपुते, गोकुळ काळे, महेश थेटे, कुणाल महाजन, सिद्धार्थ वाघ, सुरेश शर्मा, किरण भोसले, सुरेश कोकाटे आणि बाला गोविंदे यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गोखले शिक्षण संस्थेच्या क्रीडा प्रशिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामदास गुंबाडे, नंदू थेटे, योगिता सूर्यवंशी, शोभा पोरजे यांनी विशेष परिश्रम घेतले.

१०० खेळाडूंचा सहभाग
बास्केटबॉल,व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक १००, २००, ४००, ८००, १५०० आणि ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील शंभरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेते विद्यार्थी लांब उडी (मुले) योगेश मोरे, लांब उडी (मुली) मोनिका बाविस्कर, गोळाफेक (मुले) मनोज पाटील, थाळीफेक (मुले) विशाल गांगुर्डे, थाळीफेक (मुली) भाग्यश्री गुरव, १०० मीटर धावणे (मुले) रंगरेज सुफियान, १०० मीटर धावणे (मुली) मोनिका बाविस्कर, २०० मीटर धावणे (मुले) रंगरेज सुफियान, ४०० मीटर धावणे (मुली) हिरेन गोसावी, ८०० मीटर धावणे (मुले) योगेश गावित, १५०० मीटर धावणे (मुले) अभिमान मोरे, ५००० मीटर धावणे (मुले) अभिमान मोरे.
बातम्या आणखी आहेत...