आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडे जास्त, बस उभ्या, अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एसटी महामंडळ प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र प्रवासी भाड्याचा विचार केला तर खासगी बसपेक्षा अधिक प्रवासी भाडे एसटी बसचे आहे. स्पेअरपार्ट वेळेवर मिळत नसल्याने बसेस दोन-तीन दिवस डेपोत उभ्या राहतात, जास्त किलोमीटर वाहतूक केल्यास त्याचा मोबदला रुपयांच्या तुलनेत मिळावा, अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते अशा व्यथा वेतन सुधार समितीसमाेर कर्मचाऱ्यांनी मांडत एसटी वाचविण्याची मागणी केली.

एसटीच्या तोट्यात दरवर्षी भर पडत आहे. कर्मचारी संघटनांकडून वेतनवाढीबाबत होणारी मागणी लक्षात घेत एसटी प्रशासनाने वेतन सुधार समितीची स्थापना केली आहे. डी. आर. परिहार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीद्वारे प्रमुख डेपोत जाऊन तेथील कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत उत्पन्नवाढ, कर्मचाऱ्यांच्या अडचणी, वेतन सुधार आदी मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. मंगळवारी (दि. २५) समितीने विभागाचा आढावा घेतला. यावेळी समिती सदस्य एस. एम. म्हात्रे, रवींद्र धोंगडे, डी. आर. मोरे, बी. एम. जाधव यांनी विभागातील बससंख्या, उत्पन्न, कर्मचारी इत्यादीबाबत चौकशी केली. वेतनाबाबत उत्पन्नवाढीबाबत काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा केली.

समितीकडून सादर होणार राज्याचा अहवाल
वेतनसुधार समितीच्या वतीने संपूर्ण राज्यातील प्रमुख एसटी डेपोंची पाहणी केली जाणार आहे. तसेच, परराज्यातील बससेवेचाही आढावा घेण्यात येणार आहे. याबाबतच्या शिफारशी समितीकडून एसटी प्रशासनाला सादर होणार आहे. यासाठी समितीला चार महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे समितीचे प्रमुख डी. आर. परिहार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...