आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ निरीक्षकांकडून ट्रान्सफॉर्मरची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा परिसरात रविवारी अयान शेख या चिमुरड्याचा ट्रान्सफॉर्मरला चिकटल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर ‘दिव्य मराठी’ने शहरातील अशा उघड्या डीपी आणि धोकेदायक ट्रान्सफॉर्मरसह महावितरणच्या अनागोंदी कारभारावर डी.बी. स्टारच्या माध्यमातून मंगळवारी प्रकाश टाकला होता. याची दखल घेत राज्य शासनाचे मुख्य निरीक्षक एस. बी. महाजन यांनी बडी दर्गा येथील ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली.

या घटनेनंतर ‘दिव्य मराठी’ने डी. बी. स्टारच्या माध्यमातून महावितरणच्या बेफिकिरीमुळे शहरातील ट्रान्सफॉर्मर मृत्यू बनून उभे असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ट्रान्सफॉर्मर व रहिवासी इमारत यात किमान १० फूट अंतर राखणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात पाच फुटांचेच अंतर असल्याचे डी.बी. स्टारच्या पाहणीत समोर आले होते. तसेच, शहरात वर्षभरात चार अपघात झाले असल्याचे वृत्त मंगळवारी देताच या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र शासनाचे वीज वितरण कंपनीचे मुख्य निरीक्षक एस. बी. महाजन यांनी बडी दर्गा येथील ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली. या पाहणीनंतर ते म्हणाले की, याबाबतचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाईल. या अहवालात अयान शेख यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत व या दुर्घटनेला नेमके जबाबदार काेण, या बाबींचा समावेश करण्यात येईल. या वेळी उपअभियंता आर. एस. आव्हाड, कनिष्ठ अभियंता हिरे आदी उपस्थित होते.
ट्रान्सफॉर्मरला लावणार फेिन्संग : महावितरणचे उपअभियंता आर. एस. आव्हाड यांनी मंगळवारी भद्रकाली येथील विभागीय कार्यालयात बैठक घेऊन जुने नाशिकसह इतर भागातील ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून त्वरित फेिन्संग लावण्याचे आदेश दिले.
अहवाल सादर करणार
बडी दर्गा येथे झालेल्या घटनेची माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनेत नेमकी कोणाची चूक होती, याचा अहवाल पोलिस प्रशासन आणि वीज महावितरण अधिकाऱ्यांना देणार आहोत. - एस. बी. महाजन, मुख्य निरीक्षक, महाराष्ट्र शासन

शिष्टमंडळांबरोबर झाली बैठक
मंगळवारी सकाळपासूनच जुन्या नाशकात शहरातील धाेकादायक ट्रान्सफॉर्मरबाबत डी. बी. स्टारने दिलेल्या वृत्ताची चर्चा सुरू हाेती. दुपारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळांनी महावितरणच्या भद्रकाली कार्यालयात उपअभियंता आर. एस. आव्हाड याची भेट घेऊन ट्रान्सफॉर्मर संदर्भात चर्चा केली. या वेळी अयाज काझी, रिजवान काजी, मोहसीन खान आदी उपस्थित होते.