आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारूप प्रभागरचना शुक्रवारीच खुली, आरक्षण सोडतीत नकाशे लावल्यामुळे प्रभागाच्या सीमा कळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिककरांचेलक्ष लागून राहिलेली चार सदस्यीय प्रभागरचना शुक्रवारी (दि. ७) आरक्षण सोडतीदरम्यानच उकलणार आहे. आरक्षण सोडतीबराेबरच नकाशेही माहितीसाठी खुले होणार असल्यामुळे त्यातून नगरसेवक वा इच्छुकांना आपल्या संभाव्य प्रभागरचनेच्या सीमा कळणार आहेत. दरम्यान, आधी प्रारूप प्रभागरचना जाहीर करणे त्यानंतर आरक्षण सोडत अपेक्षित असताना त्याउलट कार्यक्रम निवडणूक आयाेगानेच मंजूर केल्यामुळे राजकीय पक्षाकडून हरकती येण्याची भीतीही महापालिका प्रशासनाला वाटत आहे.
सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काढल्या जाणाऱ्या या आरक्षण सोडतीत राखीव प्रवर्गासाठी जागा निश्चित झाल्यानंतर संबंधित प्रभागाचा नकाशाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणेकरून, नागरिकांना संबंधित नकाशावर काेणती जागा काेठे राखीव झाली याचे आकलन होणार आहे. मात्र, अशा नकाशातून अप्रत्यक्षपणे प्रारूप प्रभागरचनाही जाहीर होणार आहे. निवडणूक आयाेगाच्या कार्यक्रमानुसार १०आॅक्टाेबरला प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणे अपेक्षित असून २५ आॅक्टाेबरपर्यंत हरकती सूचना घेतल्या जाणार आहेत.
प्रत्यक्षात, आरक्षण सोडतीच्या निमित्ताने तीन दिवस आधीच, आॅक्टाेबरला प्रभाग रचना जाहीर होणार असल्यामुळे खुद्द निवडणूक आयाेगाच्या कार्यक्रमाच्या गाेपनीयतेचा अप्रत्यक्षरीत्या भंग होण्याची भीती आहे. मात्र, प्रारूप प्रभाग रचनेपूर्वी आरक्षण सोडत घेणे सोडतीनंतर नकाशेही नागरिकांना खुले करून देण्याचे खुद्द आयाेगाचेच आदेश आहेत. त्यामुळे महापालिकेकडे अंमलबजावणीशिवाय पर्यायच उरलेला नसून, आता कार्यक्रम जाहीर करणाऱ्या आयाेगाकडेच संभाव्य तक्रारी वा आक्षेप पाठवण्याचा पवित्रा महापालिकेला घ्यावा लागणार आहे.
इच्छुकांची धडधड, वैद्यकीय पथक सज्ज
आपलाप्रभाग आरक्षित तर होणार नाही, या भीतीने अनेक नगरसेवक वा इच्छुक धास्तावले आहेत. आरक्षण जाहीर करताना इच्छुकांची धडधड वाढते याचीही प्रशासनाला कल्पना आहे. शिवाय, सोडतीच्या पार्श्वभूमीवर माेठ्या प्रमाणात गर्दीही जमणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काेणाला आपत्कालीन वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास पथक सज्ज ठेवले जाणार आहे.
अडीच तासांत संपणार आरक्षण सोडत
महाकवीकालिदास कलामंदिर येथे महापालिकेच्या ६० राखीव प्रवर्ग महिला आरक्षणाच्या सोडतीची रंगीत तालीम बुधवारी घेण्यात आली. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शेवटच्या बाकापर्यंत आरक्षण क्रमांक असलेली चिठ्ठी दिसते की नाही, यापासून बारकाईने आढावा घेतला. खासकरून, आरक्षण सोडत सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने घेतली जाणार आहे. गर्दीमुळे कालिदास कलामंदिर अपुरे पडल्यास बाहेरील पॅसेजमध्येही स्क्रीनद्वारे माहिती दिली जाणार आहे. बी. डी. भालेकर मैदानावर तंबू लावून तेथेही आरक्षण सोडत बघता येईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, उपायुक्त विजय पगार, विधी अधिकारी बी. यू. माेरे, नगररचना सहायक संचालक आकाश बागुल, उपायुक्त हरिभाऊ फडाेळ, कार्यकारी अभियंता संजय घुगे, प्रशांत मगर आदी उपस्थित होते.
शिवसेना घेणार हरकत
प्रारूपप्रभागरचना जाहीर होण्यापूर्वीच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लावल्याच्या उलट्या कारभाराविषयी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडे 'प्रथम प्रभागरचना जाहीर करा त्यानंतरच आरक्षण सोडत', अशी मागणीही केली; मात्र हा मुद्दा निवडणूक आयाेगाच्या अखत्यारीत असल्यामुळे आयुक्त त्यांच्या स्तरावर मागणी कळवतील. दरम्यान, शिवसेनाही आता आयाेगाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...