आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभारावरून खडाजंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेली नाशिकरोड प्रभाग समिती बैठक अतिक्रमण व विद्युत विभागासंबंधित प्रश्नांवरुन चांगलीच गाजली. सभापती कोमल महरोलिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लाखाे रुपयांच्या ववििध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

नगरसेविका वैशाली दाणी यांनी शहरातील पथदीप बंद असल्याची तक्रार केली. अंधारामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तक्रार करूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. तसेच, साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपदेखील दाणी यांनी केला. तर, मालधक्काराेडवर विद्युत विभागाच्या साहित्याची खुलेआम चोरी होत असतानाही महापालिका प्रशासन मात्र गाफील आहे. या चोरीबाबत माहिती देऊनही संबंधित विभागाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप सुनील वाघ यांनी केला. नगरसेविका शाेभा आवारे यांनी चेहेडी स्मशानभूमीमधील लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह पकडून पालिका प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. असे असतानादेखील कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सूर्यकांत लवटे यांनी बिटको चाैक, शविाजी पुतळा, बिटको हाॅस्पिटल आिण महापालिकेच्या विभागीय कार्यालगत कायमस्वरुपी असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरुन प्रशासनास धारेवर धरले. हे अतिक्रमण हटवण्याचे संबंधित विभागाच्या अिधकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बैठकीतून उठणार नाही, अशी भूमिकाच त्यांनी या वेळी जाहीर केली.

किरकोळ उपस्थिती :
प्रभाग समितीच्या बैठकांना असणारी नगरसेवकांची किरकोळ उपस्थिती हा नेहमीचाच चर्चेचा विषय ठरतो. त्यातही बैठकीला उपस्थित राहणारे बहुतांश नगरसेवक हे वेळेत येत नसल्याने प्रत्येक बैठक अर्धा ते पाऊणतास उशिराने सुरू होते. ताेपर्यंत सभागृहातील विद्युत दविे व पंखे सुरुच असतात. यापूर्वीच्या बैठकांबाबतही नगरसेवकांची अशीच उदासिनता राहिली आहे.
अतिक्रमणप्रश्नी नगरसेवक लवटे यांची गांधीगिरी
गेल्या अडीच वर्षांपासून प्रभाग समितीच्या बैठकीत वारंवार आवाज उठवूनदेखील शहरातील रस्ते, फूटपाथ आिण चाैक महापालिकेकडून अतिक्रमणमुक्त करण्यात आलेले नाहीत. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून केवळ खासगी जागेतील किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचा आरोप शविसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी बैठकीत केला. एवढ्यावर न थांबता प्रभाग बैठकीत उपस्थित सर्वांना पेढे वाटून त्यांनी अतिक्रमणविराेधी पथकाचा गांधीगिरी स्टाइलने निषेधदेखील केला.
माझी बदली करा
चांगले काम करूनही बाेलणी एेकावी लागत असतील, तर मला मुक्त करावे. यापूर्वीच माझी बदली झालेली असताना, मला मुक्त करण्यात आले नाही. आता माझी बदली करा, अशी जाहीर मागणी अतिक्रमणविराेधी पथकाचे अधीक्षक एस. टी. कारवाल यांनी थेट प्रभाग समितीच्या बैठकीत केली.