आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nation Foreign Currencey Case : Nashik Police Arrested Bhikku Mhatre

देशी-विदेशी चलन चोरी प्रकरण : नाशिक पोलिसांनी केले भिक्कू म्हात्रेला जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील देशी-विदेशी चलन विनिमय कार्यालयात झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणात आणखी एका फरार संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईतील सराईत गुन्हेगार भिक्कू ऊर्फ अरविंद जनार्दन म्हात्रे यास गुन्हे शोध पथकाच्या युनिट दोनने सापळा रचून अटक केली. त्यास न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सहा महिन्यांपूर्वी तिबेटियन मार्केटसमोरील सुमंगल प्लाझा इमारतीतील ‘सेंट्रम’ डायरेक्ट कंपनीच्या कार्यालयातून लोखंडी तिजोरी पळवित सुमारे 32 लाखांचे देशी-विदेशी चलन व विदेशी बँकांचे सुमारे एक कोटीचे ट्रॅव्हलर्स चेक लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात आठवडाभरापूर्वीच पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी तथा कंपनीचा व्यवस्थापक सागर चिटणीस हाच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न होऊन त्याच्यासह कोल्हापूरच्या सराईत गुन्हेगार स्वप्नील सातपुते व फिरोज मुल्ला, कल्पेश जठार, विजय रघुनाथ शिंदे (मुंबई), स्वप्नील सातपुते, भरत मोरे, आशिष शेवाळे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी 35 लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, सोमवारी त्याची मुदत संपत आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार संशयित म्हात्रे यास तपासी पथकाने अटक केली असून, त्यानेच तिजोरी पळवित विल्हेवाट लावली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस उपायुक्त संदीप दिवाण, निरीक्षक बाजीराव महाजन, सहायक निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या पथकाने कारवाई केली.