आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Blindness Organisation Helps Blind Student

‘बंधुभाव’ जपतानाच दाखवली 630 अंधांना करिअरची वाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ देणगीदारांच्या पाठिंब्यामुळे अंध बांधवांच्या अंधांसाठीच कार्यरत असलेल्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र संस्थेने आजवर 630 अंध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यातील 208 जणांना रोजगारही मिळाला.

संस्थेची 1979 मध्ये स्थापना झाली. विशेष बाब म्हणजे या संस्थेचे सर्व पदाधिकारी दृष्टिहीन असून, संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी एमएसआयटी, मुक्त विद्यापीठाचे खास अंधांसाठीचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. हे शिक्षणही अंध शिक्षकांमार्फतच दिले जाते. संस्थेत दर वर्षी 35 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांची वर्षभरासाठी विनाशुल्क भोजन व निवासाची व्यवस्था केली जाते. 2001 ला संस्थाविस्तारानंतर कृषिनगर जॉगिंग ट्रॅकसमोर मनोर कॉलनी येथे संस्थेची इमारत उभी राहिलेली आहे.

हे बघतात संस्थेचे काम
संस्थेचे संपूर्ण कामकाज पाहणारे अध्यक्ष एम. वाय. गुरव, उपाध्यक्ष पी. आर. आवळे, महासचिव व्ही. एस. हेगडे, सचिव शुभदा पटवर्धन, कोशाध्यक्ष अनिल भालेराव हे सर्व पदाधिकारी दृष्टिहीन असूनही अत्यंत डोळसपणे कारभार पाहतात.