नाशिक- स्मार्ट
मोबाइलच्या माध्यमातून जलद प्रभावी संवाद साधला जात असल्याने वेळेच्या सर्व सीमा नष्ट झाल्या आहेत. जागतिकीकरणाच्या या प्रवाहात प्रत्येकाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परंतु, विज्ञान जसे वरदान आहे, तसेच ते शापही ठरू शकते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विधायक कामांसाठी करण्याऐवजी कळत-नकळत त्याचा नकारात्मक गोष्टींसाठी अधिक होत आहे. यामुळे नैतिक मूल्ये घसरत आहेत. मोबाइल कम्युनिकेशन इंटरनेटचा वापर विधायक कामांसाठी केल्यास प्रगतीचे ध्येय सहज साध्य होईल, असे प्रतिपादन भुजबळ नॉलेज सिटीचे डॉ. एम. यू. खरात यांनी केले.
गोदावरी शिक्षण मंडळ संचलित पाथर्डी फाटा येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत दोनदिवसीय "करंट ट्रेण्ड इन वायरलेस मोबाइल कम्युनिकेशन' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे गुरुवारी डॉ. खरात यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी डाॅ. खरात बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आय. पठाण, प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल, एम. एम. बाविस्कर, एस. व्ही. गुमास्ते, के. व्ही. शेंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. बी. बी. चौरे यांनीही विद्यार्थ्यांना स्मार्ट तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्य डॉ. बांदल यांनी सांगितले की, मोबाइलमुळे आज संवाद सहज सुलभ झाला असला तरी त्याच्या गैरप्रकारांवरून बौद्धिक पातळीवरचा शत्रूही असल्याचा धोका पुढे आला आहे. चर्चासत्रात राज्यातील विविध तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
मुलाखतीअन् समूह चर्चा
चर्चासत्रात‘वायरलेस मोबाइल कम्युनिकेशन' क्षेत्रात नव्याने येत असलेल्या ट्रेण्ड्सविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, आज विविध विषयांवरील परिसंवाद, मुलाखती, समूह चर्चा, शोधनिबंधांचे वाचन प्रश्नोत्तरे अादी कार्यक्रम होणार आहेत. संस्थेचे सचिव अशोक सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. १०) या चर्चासत्राचा समारोप होईल.
सकारात्मक विचारांतून व्हावे माहितीचे अदान-प्रधान
विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करताना खरात म्हणाले की, सामाजिक परिवर्तनात मोबाइल तंत्रज्ञानाचे मोठे योगदान असल्याने या माध्यमात होणाऱ्या बदलांची माहिती घेण्याची गरज आहे. नकारात्मक गोष्टींना पायबंद घालून सकारात्मक विचारांतून माहितीचे आदान-प्रदान करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.