आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि के. एन. डी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचा प्रारंभ करण्यात अाला. त्यामध्ये मिनी गटाच्या मुला -मुलींच्या ८व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आणि ज्युनिअर गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धांंना प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद‌्घाटन माजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाले. 
 
या वेळी मंचावर नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, गंगाधर बुरकुले, रंजन ठाकरे, राजेंद्र महाले, अशोक दुधारे, या स्पर्धेचे संचालक मोहित अश्विन, आंध्र प्रदेशचे ए. मुरली, नागेश्वर, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीप बनकर, रंजन ठाकरे डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रास्तविक अशोक दुधारे यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले. 

उद‌्घाटन साेहळ्यानंतर मिनी गटाच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. त्यामध्ये मुलांच्या फॉईल या सांघिक प्रकारात दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यात दिल्लीने महाराष्ट्राचा १५ विरुद्ध ११ असा चार गुणांनी पराभव करून विजय संपादन केला. तर त्याच गटात केरळ संघाने मध्य प्रदेशचा १५ विरुद्ध ०४ गुणाने पराभव करून विजयी सलामी दिली. मिनी मुलीच्या सांघिक सॅबर या प्रकारात कर्नाटक विरुद्ध मणिपूर या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कर्नाटक संघाने शेवटच्या काही मिनिटांत चांगला खेळ करून हा सामना १५ विरुद्ध १४ अशा अवघ्या एक गुणाने जिंकून विजय मिळविला. मात्र त्यानंतर झालेल्या सामन्यात मणिपूर संघाने डळमळून जाता दिल्लीविरुद्ध जोमाने खेळ करून हा सामना १५ विरुद्ध ०१ अशा मोठ्या फरकाने जिंकून विजय साजरा करून आपले आव्हान कायम राखले. तर मध्य प्रदेशच्या मुलीच्या संघानेही कर्नाटक संघाबरोबर खेळ करताना चांगला समन्वय राखत हा सामना १५ विरुद्ध ११ अशा गुणांनी जिंकला. आज दिवसभर साखळी सामने होणार असून, त्यानंतर उद्या बाद पद्धतीचे सामने होणार आहेत, अशी माहिती राजू शिंदे यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, नाशिक तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे, नितीन हिंगमिरे, राहुल फडोळ, अशोक पवार, मनीषा काठे, दीपक निकम आणि नाशिकचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. 

फॉईल मुले : दिल्ली विजय विरुद्ध महाराष्ट्र ( १५-११ ) 
केरळ विजयी विरुद्ध मध्य प्रदेश (१५-०४) 
गुजराथ विजय विरुद्ध महाराष्ट्र (१५-०९) 
सॅबर मुली :- १) कर्नाटक विजयी विरुद्ध मणिपूर ( १५-१४) 
२) दिल्ली विजयी आंध्र प्रदेश (१५-१०) 
३) मणिपूर विजयी विरुद्ध दिल्ली (१५-०४) 
 
बातम्या आणखी आहेत...