आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी ‘बीवायके’च्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्लास्टिकवर बंदी असतानादेखील सर्रास प्लास्टिकचे झेंडे विकले जातात. प्रजासत्ताक दिनानंतर दुसर्‍या दिवशी हे झेंडे ठिकठिकाणी धूळ खात पडतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होत असल्याने हा प्रकार टाळण्यासाठी बीवायके महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत कागदी झेंडे व पर्यावरण पूरक पिशव्या तयार केल्या आहेत. एवढेच नव्हे तर या पिशव्या व झेंडे नागरिकांना व विक्रेत्यांना मोफत वाटप करण्यात येत आहे.

बीवायकेच्या विद्यार्थी रिया सन्सानी, ऋषभ चढ्ढा, समृद्धी मुखेडकर, प्रा. कांचन देसले यांनी वर्तमानपत्रांच्या साहाय्याने कागदी पिशव्या तर झाडूच्या काड्या, रद्दी आणि विविध रंगांपासून पर्यावरणपूरक कागदी झेंडे तयार केले आहेत. ‘नाशिक सिटी, ड्रीम सिटी, क्लीन सिटी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला आहे. प्रा. कांचन देसले यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. मेनरोडचा परिसर, शालिमार, कॉलेजरोड, गंगापूररोड अशा ठिकाणी कागदी झेंडे व पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

पर्यावरणाचे संवर्धन
पर्यावरण संवर्धनाचे काम या उपक्रमाद्वारे आम्ही करीत आहोत. हर्षित डोंगरे, विद्यार्थी

जनजागृती व्हावी
विद्यार्थ्यांपासूनच जनजागृती झाली तर ती आयुष्यभर त्या विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या पालकांच्या स्मरणात राहाते. आणि ह्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी स्वत:हून सहभाग घेतात. कांचन देसले, प्राध्यापिका, बी.वाय.के. कॉलेज

जनजागृती सुरू
या उपक्रमामुळे जनजागृती सुरू झाली आहे. यातून प्लास्टिकमुक्त नाशिक करू या. रिया सनान्से, विद्यार्थी