आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Integration Environmental Messege, Ganesha Desert

राष्ट्रीय एकात्मता अन‌् पर्यावरणाचा जागर, सामाजिक संदेश देत लाडक्या बाप्पाला निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको-‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप दिला. या वेळी परिसरातून मिरवणूक काढत राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाएसोचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर होते. व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील, नगरसेवक सुधाकर बडगुजर, तानाजी जायभावे आदी उपस्थित होते. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, समाधान वाघ, सुमेध सोनोने यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात, लेजीम पथकाच्या जल्लोषात, टाळ-वाद्यांच्या तालात श्रीगणेशाची संपूर्ण परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका रत्नप्रभा सूर्यवंशी, एल. एस. जाधव, पर्यवेक्षिका संध्या जोशी, ज्योती कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी यांच्यासह पालक-शिक्षक संघ, सर्व शिक्षक वृंद, शिवमुद्रा ढोल पथक आदींनी प्रयत्न केले.
विद्यालयातच बाप्पांचे विसर्जन
पर्यावरणसंवर्धनासाठी बसविण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणपतीचे शाळेतच विसर्जन करण्यात अाले. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील निर्माल्य गोळा करीत ते कचरा गाडीत टाकले. तसेच, विविध फलकांद्वारे प्रबोधन केले.
भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन
मराठमोळ्यासंस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीत घडले. मुलांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, संत-वारकरी आदींच्या वेशभूषा अन‌् ढोल-लेजीम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधले.