आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय जलतरणपटू साैरभ साेनकांबळेचे अपघाती निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीय जलतरणपटू सौरभ हरी सोनकांबळे (१८) याचे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अपघाती निधन झाले. नाशिकराेडकडून नाशिकला येत असताना फेम मल्टिप्लेक्सपुढील अालमगीर हाॅटेलसमाेर त्याची दुचाकी डंपरवर मागून अादळून डाेक्याला जबर मार लागल्याने त्याचा करुण अंत झाला. नाशिक महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांचा ताे ज्येष्ठ पुत्र हाेता. इतक्या माेठ्या अाघातानंतरही कुटुंबीयांनी साैरभच्या नेत्रदानाचा निर्णय घेऊन सायंकाळी नेत्रदान केले.

साैरभ शनिवारी दुपारी बाेधलेनगर येथील घरातून नाशिकला क्लाससाठी निघाला हाेता. घरातून अॅक्टिव्हावर (एमएच १५ इझेड ८०४९) बाहेर पडून पुणे-नाशिक राेडच्या मुख्य रस्त्यावर अाला असतानाच दुचाकी पुढील डंपरवर (एमएच ०६ के २६६८) अादळल्याने अपघात घडला. हे वृत्त कळताच जलतरणपटू जलतरणप्रेमींनी साेनकांबळेंच्या बाेधलेनगरातील निवासस्थानी धाव घेतली. साैरभने हेल्मेट घातले असते तर ताे वाचू शकला असता अशी हळहळ यावेळी व्यक्त केली जात हाेती. अारवायकेमध्ये बारावी सायन्सला ताे शिकत हाेता. साैरभच्या पश्चात वडील हरी साेनकांबळे, अाई, लहान भाऊ, अाजी अाजाेबा असा परिवार अाहे.

राज्य, राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये चमक
साैरभने राज्य राष्ट्रीय स्तरावरील विविध जलतरण स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळविली हाेती. सागरी जलतरणात तर ताे अत्यंत तरबेज हाेता. त्याने मुंबईसह देशभरातील अनेक जलतरण स्पर्धांमध्ये ८१ किलाेमीटर, ४५ किलाेमीटर, ३५ किलाेमीटर अाणि किलाेमीटरच्या स्पर्धांमध्येही चमक दाखवली हाेती.

नेत्रदानाचा अवघड निर्णय
साैरभच्याअचानक झालेल्या अपघातामुळे संपूर्ण साेनकांबळे कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळलेला असतानाही वडील हरी साेनकांबळे अाणि अन्य ज्येष्ठांनी मिळून साैरभचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी पाेस्टमाॅर्टेमसाठी त्याला अॅम्ब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात अाणल्यावर निदान त्याच्या डाेळ्यांनी दुसरे कुणीतरी हे जग बघेल म्हणून नेत्रदान करण्यास सांगून सर्व कागदाेपत्री साेपस्कार पूर्ण करण्यात अाले. त्यानंतर रात्री उशिरा नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...