आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Youth Congress Party Election Issue At Nashik

आज युवक कॉँग्रेस निवडणुकीचा फैसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- युवक कॉँग्रेसच्या नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्षापासून तर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी गुरुवारी झालेल्या प्रक्रियेत 80 टक्के मतदान झाले. यापाठोपाठ शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी (दि. 31) मतदान होणार आहे. दुपारी 4 वाजेनंतर लागलीच दोन्ही प्रक्रियेतील मतमोजणी होऊन नवीन कारभार्‍यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

युवक कॉँग्रेसच्या अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची निवडणूक प्रक्रिया गुजरातच्या पक्ष निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावेळी आणि यंदाही राबविण्यात आली. निवडणूकीत पारदर्शकता आणण्यासाठी व निष्ठावंतांना न्याय मिळण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार गेल्यावेळेप्रमाणे तीन वर्षांसाठी निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन पदाधिकार्‍यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार गेल्या महिन्यात बूथस्तरावर अकरा पदाधिकार्‍यांची निवडणूक घेण्यात आली.

त्यापाठोपाठ गुरुवारी नाशिकरोड-देवळाली, इगतपुरी व सिन्नर विधानसभा मतदारसंघातील अध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले. याच मतदारांनी महाराष्ट्र अध्यक्ष व नाशिक लोकसभा मतदारसंघातील अध्यक्षांसाठीही मतदान केले. 80 टक्के मतदान झाले असून, मतमोजणी नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघांच्या मतदानानंतर केली जाणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नगरसेवक राहुल दिवे, राकेश दोंदे यांच्यात चुरस आहे. दरम्यान, शुक्रवारी नाशिक-पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक-मध्य या तीन मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यात नाशिक मध्यसाठी स्वप्निल पाटील यांच्या विरोधात आणखी दोघे तर पूर्व साठी तुषार जगताप व सचिन भुजबळ यांच्यात लढत होणार आहे.