आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Decend On Road For Onion Export Price

कांदा निर्यातमूल्यावरून राष्ट्रवादी रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - किरकोळ बाजारात कांदा दरात वाढ होऊ नये म्हणून केंद्र सरकारने निर्यातमूल्यात १७५ डॉलर प्रति टनाने वाढ केल्याने बाजार समित्यांमध्ये कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत अाहे. गुरुवारी निर्यातमूल्यात वाढ केल्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाभर रास्ता रोको करून कांदा निर्यातमूल्य रद्द करण्याची मागणी केली. पिंपळगाव, कळवण, दिंडोरी, निफाड, शिंदे आदी ठिकाणी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

बाजार समितीमध्ये कांदा प्रति क्विंटल २१०० रुपयांनी जाण्यास सुरुवात होताच किरकोळ बाजारात कांदादर वाढीने ग्राहकांमध्ये ओरड होऊ नये आणि व्यापाऱ्यांनी कांदा साठवणूक करून कृत्रिम दरवाढ करू नये म्हणून निर्यातमूल्यात २५० हून १७५ ने वाढ करीत प्रति टन ४२५ डॉलर केले. त्यामुळे निर्यातदारांनी कांदा निर्यात करण्याचे थांबविल्याने तो कांदा देशांतर्गत विक्री होत अाहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. गुरुवारी सटाणा, कळवण, निफाड, पिंपळगाव, शिंदे, येवला येथे रास्ता रोको केला. राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे महामार्ग, मुंबई - आग्रा महामार्ग, शिर्डी - सिन्नर, नाशिक - वणी, नाशिक- जव्हार या प्रत्येक मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला होता.
कांदा निर्यातमूल्यात कपात करावी, या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.

शेतकऱ्यांच्या खांद्यावर व्यापाऱ्यांची बंदूक
उन्हाळकांदा बाजारात येण्यास सुरुवात होताच बहुतांश व्यापारी कांदा साठवणूक करून ठेवतात. त्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊन किरकोळ बाजारात दरवाढ होते. याचाच फायदा घेत साठवणूकदार आपल्या साठविलेल्या कांद्याची दुप्पट ते तिप्पट नफा कमावितात. मात्र, यामध्ये जुगार असल्याने बहुतांश व्यापाऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे निर्यातमूल्य कमी करण्यामागे व्यापारीही मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचे दिसून येेते.