आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist, Congress Fighting Eachother Over The Fund

निधीवरून राष्ट्रवादी,काँग्रेसमध्ये धुसफूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा वार्षिक योजनेतून 8 कोटी रुपयांच्या निधीचे असमान वाटप करताना राष्ट्रवादीच्या सभापतीपासून तर कॉँग्रेसच्या वजनदार सदस्यांनाही धक्का मिळाल्यामुळे धुसफूस वाढली आहे. राष्ट्रवादीच्या शिक्षण सभापती ज्योती माळी यांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडेच दूरध्वनीद्वारे तक्रार करीत निधी मिळालाच पाहिजे अशी मागणी केल्याचे सांगितले.

वजनदार पदाधिकारी व सदस्यांना खूश करताना शिवसेनेसह विरोधकच नाही, तर राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या सदस्यांनाही कात्रजचा घाट दाखवण्यात आला. शिक्षण सभापती ज्योती माळी यांच्या मतदारसंघात माडा योजनेतील कामे मंजूर असल्यामुळे त्यांना लघुपाटबंधारे विभागाचा निधी न देण्याच्या हालचाली होत्या. त्याची कुणकूण लागल्यानंतर माळी यांनी अध्यक्षांनी दूरध्वनी करून गटातील 21 बिगर आदिवासी गावात कामे कशी करायची असा प्रश्न विचारल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्षांनी नियोजन अंतिम झाले नसल्याचे सांगत निधी देण्याचे आश्वासन दिले.


मिर्लेकरांकडेच तक्रार
निधी नियोजनात शिवसेनेच्या सदस्यांवर अन्याय होत असतानाही गटनेते व अन्य वरिष्ठ नेत्यांकडून हस्तक्षेप होत नसल्यामुळे काही सदस्य वैयक्तिकरित्या रवींद्र मिर्लेकर यांना साकडे घालणार आहे. त्यांच्या आक्रमक व निपक्षपाती भूमिकेमुळे मितभाषी सदस्यांना न्याय मिळेल असे एका सदस्याने सांगितले. दुसरीकडे शिवसेनेतील फुटीचा फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडला आहे.

अधिकार्‍यांवर दबाव
गेल्यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे तात्कालीन कार्यकारी अभियंता बाविस्कर यांनी असमान निधी वाटपाच्या धोरणाला विरोध व सत्ताधार्‍यांशी संघर्ष केला. मात्र सध्यस्थितीत लघूपाटबंधारेच्या दोन्ही विभागांची सूत्रे प्रभारी अधिकार्‍यांकडे आहे. त्यामुळे अनुभवाची कमतरता हेरून प्रभारी अधिकार्‍यांवर दबाव टाकून निधी नियोजन पदाधिकारी करीत असल्याचे चित्र आहे.