आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist, Congress Give Bribing To The Shivsena

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीची शिवसेनेला 43 टक्के निधी देण्याचे आमिष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - समान निधीसाठी संघर्ष करणार्‍या शिवसेनेसह विरोधकांना 43 टक्के निधी देण्याचा शब्द सत्ताधारी राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान आंदोलनाची भाषा करणारे गटनेते अचानक का मवाळ झाले या चिंतेने सदस्यांच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेत गेल्या दीड वर्षापासून सत्ताधारी व विरोधक असा वाद धुमसत आहे. गेल्या वर्षी असमान निधी वाटपामुळे शिवसेनेच्या सदस्यांनी दोन दिवस उपोषण केले होते. उपोषणानंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या हस्तक्षेपामुळे सत्ताधार्‍यांनी पुढील वर्षी समान निधीचे वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात, मात्र चालू वर्षी जिल्हा परिषद सेस व लघुपाटबंधारेच्या निधीत विरोधकांना धक्का देण्यात आला. सर्वसाधारण सभेत ठराव समान निधी देण्याबाबत ठराव केल्यानंतरही अन्याय होत असल्यामुळे शिवसेना, भाजप व माकपाच्या गटनेत्यांनी जाहीररित्या आंदोलनाचा इशाराही दिला. प्रत्यक्षात मात्र, गेल्या काही दिवसांपासून गटनेत्यांनी सीईओ भेटत नसल्याचे कारण देत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

गटनेत्यांना जादा निधी देवून सत्ताधारी अन्य सदस्यांची गळचेपी करतील अशीही भीती आहे. त्यातून एका सदस्याने शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे तक्रारही केल्याचे वृत्त आहे. दरम्यान सत्ताधार्‍यांनी विरोधकांना 43 टक्के निधी देण्याचे मान्य केल्याचे शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप निधी नियोजनाच्या अंतिम याद्या विरोधकांना मिळालेल्या नाही.

केंद्र व राज्य शासनाकडून येणार्‍या विविध योजनांचा निधी हा जिल्ह्याच्या सर्व भागात समान न्यायाने वाटण्यात यावा, अशी माफक अपेक्षा ज्येष्ठ सदस्यांची आहे.