आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress No Solution In Congress, Independent Battle

काँग्रेस, अपक्षांच्या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेसची पंचाईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाआघाडीतीलअंतर्गत तडजाेडीमुळे प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक एकतर्फी हाेण्याची चिन्हे असताना आता पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदावरून राष्ट्रवादी अपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दुसरी बाब म्हणजे, काँग्रेसने उडी घेत दाेन सभापतिपदांसाठी दावा केल्यामुळे राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. महापाैरांच्या रामायण या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेसला दाेन जागा द्यायच्या असतील तर अपक्षांना थांबवावे, असाही प्रस्ताव पुढे आला. या सर्वात गुरुवारी (दि. ९) सकाळी हाेणा-या घडामाेडीच महाआघाडीसाठी सरळ हाेणा-या निवडणुकीचे चित्र पालटवू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाशिक पूर्व, पश्चिम पंचवटी या तीन प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी गुरुवारी निवडणूक हाेणार आहे. मनसे, राष्ट्रवादी, अपक्ष काँग्रेस यांच्या युतीमुळे निवडणूक निव्वळ आैपचारिकताच राहिली आहे. नाशिक पश्चिमच्या सभापतिपदासाठी तर शिवसेना भाजपने अर्जही दाखल केलेला नाही. ही जागा काँग्रेसला याेगिता आहेर यांच्यासाठी महाआघाडीने साेडल्याचे समजते. मनसेला सातपूर सिडकाे प्रभाग समिती सभापतिपद दिल्यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्ष या तिघांमध्ये एक-एक सभापतिपद दिले आहे. सकाळच्या टप्प्यात राष्ट्रवादी अपक्षांमध्ये दाेन जागांवरून चुरस वाढली हाेती. पंचवटी प्रभाग समितीचे सभापतिपद त्याचे कारण बनले आहे. त्यात विशेषत: पंचवटी प्रभाग समिती सभापतिपद राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे यांच्यासाठी, तर अपक्षांकडे शबाना पठाण यांच्यासाठी नाशिक पूर्वचे सभापतिपद साेडल्याची तडजाेड झाल्याचे वृत्त हाेते. मात्र, अपक्षांकडून भाजपच्या संपर्कात असलेले दामाेदर मानकर यांनी पंचवटी प्रभाग सभापतिपदासाठी दावा केल्यामुळे निवडणूक रंगात आली आहे. पंचवटी प्रभागाचे सभापतिपद मानकर यांच्यासाठी अपक्षांना दिले, तर मग नाशिक पूर्व प्रभाग समिती सभापतिपदासाठी संजय साबळे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला संधी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दाेन्ही इच्छुक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या जवळचे मानले जात असल्यामुळे काेणाला संधी मिळते काेणाचा पत्ता कट हाेताे, हे बघणे रंजक ठरणार आहे.

त्यातच सायंकाळी काँग्रेसने पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदावर दावा केल्यामुळे अपक्षांची अडचण झाली. अपक्षांना उपमहापाैर, तसेच स्थायी समिती सदस्यपद दिलेले असल्यामुळे काँग्रेससाठी सभापतिपद साेडावे, अशी मागणी पुढे आली. त्यामुळे निष्फळ बैठकांचा धडाकाच ‘रामायण’वर बुधवारी दिवसभर सुरू हाेता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी हाेणा-या निवडणुकीत काय घडामाेडी घडतात, त्यावर तिन्ही समित्यांचे चित्र अवलंबून असेल.

मनसे, शिवसेनेने फडकवला झेंडा
बुधवारी(दि. ८) सातपूरमध्ये मनसेच्या उषा शेळके, तर सिडकाेमध्ये कांचन पाटील यांची सभापतिपदासाठी सरळ निवड झाली. नाशिकराेडमध्ये केशव पाेरजे यांच्या रूपाने शिवसेनेला प्रभाग समिती सभापतिपद मिळाले. पहिल्या टप्प्यात शिवसेना, मनसेचा झेंडा प्रभाग समिती सभापतिपदाच्या रूपाने फडकला असून, गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्षांना संधी मिळेल, असे चित्र आहे. तूर्तास निवडणुकीत केवळ भाजपच दूर असल्याचे दिसत आहे