आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे पदाधिकारी सेनेत दाखल, डॅमेज कंट्राेलसाठी जितेंद्र अाव्हाड अाज सिन्नरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - पंचायत समितीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते उदय सांगळे यांनी पंचायत समितीच्या सहा सदस्यांसह शहर विकास अाघाडीचे नेते विजय जाधवांसह अाठ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतलेले अामदार जितेंद्र अाव्हाड ‘डॅमेज कंट्राेल’साठी बुधवारी सिन्नरला येत अाहेत. जिल्हा प्रभारी झाल्यानंतर अाठवडाभरातच त्यांचे मूळ गाव असलेल्या सिन्नरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष साेडल्याने अाक्रमक तापट म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या अाव्हाड यांच्या संघटनकाैशल्याची पहिली परीक्षा सिन्नरमध्येच हाेऊ घातली अाहे.
मुंबईतझाला प्रवेश साेहळा : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सांगळेंसह इतरांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. सेनेत सर्वांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही देताना अागामी निवडणुकांमध्ये सिन्नरला शिवसेनेचा भगवा फडकेल, यात शंका नसल्याचे सांगून लवकरच सिन्नरच्या दाैऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार अनिल देसाई, विनायक राऊत या ज्येष्ठ नेत्यांसह खासदार हेमंत गाेडसे, बबन घाेलप, अामदार राजाभाऊ वाजे, याेगेश घाेलप, विजय करंजकर, अजय बाेरस्ते, सत्यभामा गाडेकर, दीपक खुळे अादी उपस्थित हाेते. सुमारे १०० कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कूच केले. दुपारी शिवसेना भवन येथे प्रवेश पार पडला.
यांचाझाला प्रवेश : राष्ट्रवादीचेपंचायत समितीतील गटनेते उदय सांगळे, सदस्य प्रकाश कदम, वसंत उघडे, अलका पवार, सविता पवार साेनाली कर्डक, माणिकराव काेकाटे समर्थक कॉँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या छाया दळवी यांचे पती भाऊसाहेब दळवी, टाकेद गटातील पंचायत समिती सदस्य हरिदास लाेहकरे, नगरपालिकेतील शहर विकास अाघाडीचे गटनेते विजय जाधव, नगरसेवक मनाेज भगत, शैलेश नाईक, प्रमाेद चाेथवे, विजया बर्डे, शुभांगी झगडे, पुष्पा लाेणारे, मनीषा घाेरपडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
असाहाेईल राजकीय परिणाम :
पंचायतसमिती सदस्या छाया दळवी सेनेच्या बाजूला अाल्याने सत्ताधारी गटाने बहुमत गमावले अाहे. त्यामुळे सत्तांतराची शक्यता नसली, तरी सभागृहातील कामकाजात सेनेचा वरचष्मा वाढणार अाहे. नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे माेठे बहुमत असल्याने शहर विकास अाघाडीच्या पक्षांतराचा काेणताही परिणाम कामकाजावर हाेणार नाही. मात्र, पक्षीय दृष्टिकाेनाचा विचार करता कागदाेपत्री शिवसेनेचे बळ वाढल्याने संघटनेत उत्साहाचे वातावरण अाहे.
केवळ तांत्रिक बदल
उदय सांगळेंसह पंचायत समिती सदस्य सेनेसाेबतच हाेते. त्यांनी पक्षप्रवेशाची राहिलेली अाैपचारिकता पार पाडली. राष्ट्रवादीचे काेणतेही नुकसान नाही. जितेंद्र अाव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करू. - राजाराम मुरकुटे, तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉँग्रेस
राष्ट्रवादीकॉँग्रेसविषयी कुठलीही कटुता नाही
चांगले काम केल्याने पंचायत समितीतील सत्ता केवळ एक मताच्या फरकाने दूर राहिली हाेती. पक्ष नेत्यांविषयी मनात काेणतीही कटुता नाही. जनहिताची कामे करण्यासाठी शिवसेना हाच पर्याय असल्याने शिवबंधन बांधले. - उदय सांगळे, गटनेते,पंचायत समिती
बातम्या आणखी आहेत...