आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist Youth Congress News In Marathi,Political Leader Appointment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नेमणुकांचे कवित्व; नाराजीचा पाढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याची वेळ असताना राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शहर शाखेला मात्र अंतर्गत राजी-नाराजीचाच सामना करावा लागत आहे. शहराध्यक्षांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 51 लोकांच्या कार्यकारिणीत जुन्या अनेक पदाधिकार्‍यांना डावलल्याचा दावा करीत काहींनी जिल्हा कार्यकारिणीत कामाला सुरुवात केली आहे, तर काहींनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे. एकंदर नेमणुकीचे कवित्व अजूनही सुरूच आहे.
काही महिन्यांपासून वादात असलेल्या रायुकॉँला अंतर्गत वादामुळे निवडणुकीच्या प्रचाराची संधीच मिळत नसल्याचे दिसते. रायुकॉँचे शहराध्यक्ष छबू नागरे यांनी जम्बो कार्यकारिणी बरखास्त करून निवडक पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात आपल्याला डावलल्याचा आरोप संबंधित माजी पदाधिकारी करीत आहेत.
मी डोईजड झालो
मी डोईजड झालो होतो. त्यामुळे विभागीय अध्यक्षपद काढून सरचिटणीसपद दिले. ही गोष्ट न पटल्याने मी जिल्हा कार्यकारिणीत काम करीत आहे.- वैभव देवरे, जिल्हा उपाध्यक्ष, रायुकॉँ
.तरीही राजीनामा नाही
शहराध्यक्षांचे वय 35पेक्षा अधिक आहे, हे मी सिध्द केले तरीही विद्यमान त्यांनी राजीनामा दिला नाही. - संतोष भुजबळ, जिल्हा संघटक,
प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार
शहर सरचिटणीस म्हणून मी मोठे काम उभे केले तरीही मला डावलण्यात आले. यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहे. - आदिल सिध्दकी, माजी शहर सरचिटणीस, रायुकॉँ
मर्जीतल्यांनाच संधी
नागरेंनी तिसर्‍यांदा कार्यकारिणी जाहीर केली. मर्जीतल्यांनाच ते पदे देतात असा अनुभव आहे.- दिनेश चव्हाण, माजी शहर सरचिटणीस
आज नाही तर भविष्यात मिळेल संधी
कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वी संबंधित विभागातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जाते. . शिवाय खासदार समीर भुजबळ यांच्याकडून या कार्यकारिणीला अंतिम मंजुरी घेण्यात आली आहे. कार्यकर्त्यांपेक्षा नेते अधिक झाल्याने प्रत्येकाला पदे देणे मुश्कील होते. आज ज्यांना पदे मिळाली नाहीत, त्यांना भविष्यात मिळू शकतात. - छबू नागरे, शहराध्यक्ष, रायुकॉँ