आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्गाची खिडकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंचवीचे फळ / Martynia annua
पावसाळ्यात ओसाड जागी, तसेच रस्त्याकडेने विंचवीची कमरेएवढ्या उंचीची झुडुपे उगवतात. त्यांच्या पत्रकोणातून लोंबकळणारी, बोटभर लांबीची, नलिकाकार फिकट गुलाबी रंगाची सुंदर फुले उमलतात. पावसाळ्यानंतर विंचवीच्या वाळलेल्या काटक्यांवर विचित्र आकाराची फळे वर्षभर लटकताना दिसतात. सुरुवातीला हिरवी असणारी ही फळं वाळल्यावर काळपट तपकिरी होतात. अत्यंत टणक, लाकडासारख्या कठीण अशा या 2 ते 3 से. मी. लांबीच्या फळांना खालच्या बाजूला हुकसारखे गोल वळलेले दोन तीक्ष्ण काटे असतात. विंचवाच्या नांगीसारख्या या काट्यांमुळे याला ‘विंचवी’ नाव पडलंय. भटक्या जनावरांच्या अंगावरील केसांत हे काटे अडकून त्या प्राण्यांबरोबर फळे दूरवर नेली जातात. अशाप्रकारे बीजप्रसार होण्यासाठी या विशेष रचनेचा उपयोग होतो.