आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहनतीतून बहार...रखरखीत आणि उजाड भूमीला दिला निसर्गरम्य नजराणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अनुकूल हवामान, मुबलक पाणी आणि लागवडीला उत्तम अशी जमीन या प्रकारचा जामानिमा असल्यावर उच्च दर्जाची उद्याने फुलवणे यात वेगळेपणा आणि कष्टसाध्य ते काय? पण, जगाच्या पाठीवर काही ठिकाणी आणि आपल्या नाशिकमध्येही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समाधानाने डोलणाऱ्या विविधरंगी फुलझाडांसह नयनमनोहर हिरवळ जोमाने बहरली आहे. त्यामागे आहे एक जिद्द आणि परिस्थितीपुढे हार मानण्याची विजिगीषू वृत्ती. जिथं थेंबभर पाणीही नजरेच्या टप्प्यात येत नाही, दगड-धातूंनी जमीन उजाड झाली आहे, अशा स्थळांचे नंदनवन बनवणाऱ्या साधकांची ही निसर्गयात्रा...

उजाड जमिनींवर थंडगार हिरवाईचा िशडकावा, जिगरबाज आधुिनक भगीरथांच्या अथक प्रयासामुळे उद्याने बनली पर्यटकांची आकर्षण केंद्रे

नाशिकनजीकच्या चांदशीत नंदनवन
नाशिकलगतच्याचांदशी शिवारात बांधकाम व्यावसायिक मनोज टिबरेवाल यांनी पडीक जागेचा वापर करून सव्वा एकरमध्ये नयनरम्य उद्यान फुलवले आहे. भिंतीएेवजी बांबू तारांचा वापर, पर्यावरणपूरक कुंपण अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. अितशय किफायतशीर पद्धतीने अनावश्यक खर्च टाळत उभारलेल्या या उद्यान नििर्मतीचा आदर्श महापालिका प्रशासनाने घेतला तर शहरातील उद्यानेही बहरतील.

अबू धाबीच्या वाळवंटातील अल‌् एेन
ओअॅसिसआपण केवळ परीकथांमध्येच वाचले आहे. पण, असे िनतांत रमणीय ओअॅसिस अबू धाबीजवळील वाळवंटात अल् एेन नावाने फुलवलेले आहे. त्याचे आता गार्डन सिटी असेच नामकरण झाले आहे. दुबईला जाणारे पर्यटक आवर्जून तेथे जातातच. पाम ट्रीच्या रांगाच रांगा, जमिनीखाली झुळझुळणारे झरे, तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीची जलसिंचन योजना ही या वाळवंटातल्या उद्यानाची काही वैशिष्ट्ये आहेत.

कॅनडात सिमेंटच्या नफ्यातून बुचार्ट गार्डन
उत्तरअमेरिकेतील सिमेंट उद्योगाचे जनक राॅबर्ट बुचार्ट यांनी उद्यानविद्येची आवड असलेल्या त्यांच्या पत्नी जेनी यांच्या साहाय्याने १९०६ ते १९२९ या काळात चुनखडीने भरलेल्या त्यांच्या खाणीच्या परिसरात गुलाबाच्या विविध जातींची बाग फुलवली. नंतरच्या काळात जपानी गार्डन, इटालियन गार्डन राेज गार्डनचा हा सुखद पसारा इतका वाढला की, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्रच बनला.