आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nature Society Of Nashik,latest News In Divya Marathi

बुलेट रॅलीद्वारे ‘पक्षी वाचवा’चा जागर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- क्रूझिंग गॉड्स, रॉयल एनफिल्ड रायडर्स क्लब आणि नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी ऑफ नाशिकतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘पक्षी वाचवा’ अभियानासाठी शुक्रवारी (दि. 15) बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 187 बुलेटस्वारांनी सहभाग नोंदविला. रॅलीत सर्वात जुनी ठरलेली 1952 सालची बुलेट, तर तीन लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली मुंबई येथील बुलेट या गाड्या रॅलीच्या मानकरी ठरल्या. त्यांच्या चालकांचा करंडक देऊन गौरव करण्यात आला. रॅलीत तरुणींनीदेखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता ‘दिव्य मराठी’ माध्यम प्रायोजक असलेली बुलेट रॅली सुरू होऊन कॉलेजरोड येथील मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल, गंगापूर नाका, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, मायको सर्कल, एबीबी सर्कल यामार्गे गेल्यानंतर कॉलेजरोड येथे रॅलीचा समारोप झाला. या वेळी ‘पक्षी वाचवा’चा संदेश देतानाच, वाहने चालविताना नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन करण्यात येत होते. या वेळी मकरंद उदावंत, बी. राहा, सागर वर्मा, हर्षल पाटील, आनंद बनसोडे, स्वप्नील जाधव, विनीत वाघमारे आदी उपस्थित होते.