आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natya Parishad Award For Ashok Saraf, Jayant Pawar

अशाेक सराफ, जयंत पवार यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार जयंत पवार यांना, तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशाेक सराफ यांना जाहीर झाला अाहे. दर दाेन वर्षांनी देण्यात येणारे हे पुरस्कार नाट्य परिषद शाखा अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी शुक्रवारी जाहीर केले. बाबूराव सावंत पुरस्कार नाशिकच्या सुषमा अभ्यंकर यांना देण्यात येणार अाहेे.

या दाेन्ही मुख्य पुरस्कारांचे स्वरूप २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, तर सावंत पुरस्कार पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे अाहे. यंदा नाट्य परिषदेच्या सभासदांना अावाहन करून संभाव्य नावे अाधीच कळविण्यात अाली हाेती. त्यातून सभासदांना चिठ्ठीद्वारे नाट्य परिषदेस अापले मत कळवायचे हाेते. पण या प्रक्रियेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. पण, नाट्य परिषदेकडे अालेली १५-२० मते अाणि या पुरस्कारांच्या निवडीसाठी काम करत असलेल्या समितीत एकमत झाल्यानंतर हे पुरस्कार जाहीर करण्यात अाले अाहेत.

या समितीत प्रा. कदम यांच्यासह प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, खजिनदार रवींद्र ढवळे, विवेक गरुड डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा समावेश हाेता.

नाट्य शिबिरासाठी पाच रंगकर्मी : साेलापूर येथे झालेल्या पहिल्या नाट्य संमेलनानंतर नाट्य परिषदेतर्फे पुणे येथे बालनाट्य चळवळीसाठी शिबिर घेण्यात येत अाहे. कांचन साेनटक्के हे शिबीर घेणार अाहेत. मार्चपासून हाेणाऱ्या या शिबिरासाठी नाशिकमधून सागर रत्नपारखी, प्रफुल्ल दीक्षित, सिद्धार्थ अहिरे, कृतार्थ कंसारा अानंद जाधव यांना नाट्य परिषदेतर्फे पाठविण्यात येणार अाहे.

२७ मे राेजी होणार पुरस्कारांचे वितरण
शिरवाडकर कानेटकर पुरस्कार वितरण साेहळा महाकवी कालिदास कला मंदिरात २७ मे २०१६ राेजी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष अभिनेते माेहन जाेशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर अाणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हाेणार अाहे.

सुषमा अभ्यंकर नाटक कारकीर्द
सुषमा अभ्यंकरांनी नाटक, नाटुकली, पाेवाडे, गीते यांचे विपुल लेखन केले अाहे. वृत्तपत्रांतूनही लेखन सुुुरू असते. १७ बालनाट्यांपैकी नाटकं प्रकाशित झाली अाहेत. अन्य ३३ पुस्तकेही त्यांनी लिहिली अाहेत. काही नाटकांमध्ये कामही केले अाहे. सुधा करमरकर, सुलभा देशपांडे यांच्या नाट्यशिबरांतून त्यांनी धडे घेतले अाहेत. सार्वजनिक वाचनालय, लाेकहितवादी मंडळ येथे त्यांनी पदे भूषविली तर अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले अाहे. सदाफुली या संस्थेतर्फे त्यांनी बालनाट्य चळवळ सुरू केली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले अाहेत.