आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळे उपेक्षितांसाठी; पण कुणी फिरकलेच नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाबाबत असंतोष व्यक्त होत आहे. त्यावर आता काही कलाकारांनी एकत्र येत एचपीटीत बैठक घेतली पण या बैठकीला ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांनी माध्यमांकडे असंतोष व्यक्त केला त्यांनीच बचावात्मक माघार घेत अनुपस्थिती दर्शवली. मात्र दोन ते तीन नाट्यसंस्थांच्या अठरा कलाकारांनी एक निवेदनच तयार केले असून ते सांस्कृतिक संचालनालयास दिले जाणार आहे.

प्रणित बोडके, तन्मयी चव्हाणके, वासंतिका वाळके, दिनेश चौधरी, देवदत्त वैद्य, सम्राट पटेल, सौरभ टोचे, अजिंक्य पंचवाघ, महेश बापट, आकाश पाठक, उदय परशुरामी, सुयोग देशपांडे, स्नेहल नाईक, श्रद्धा काळे यांच्यासह इतर अठरा कलाकारांनी निकालावरील राजकारणाविषयी चर्चा करीत मागण्यांचे निवेदन तयार केले. मात्र अश्वमेध थिएटर्सच्या कलाकारांनी केवळ निवेदनास सर्मथन असल्याचे फोनवरुनच बैठक घेणार्‍यांना सांगितले.