आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्थापनेने नवरात्राेत्सव पर्व सुरू; भाविकांमध्ये उत्साह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देवीची मनाेभावे अारती पूजनासह घराेघरी घटस्थापना झाली अन् नवरात्राेत्सवाच्या पवित्र पर्वाला शनिवारपासून प्रारंभ झाला. ‘सर्व मंगल मांगल्ये ...’ नमाे देव्यै महादेव्यै...’ अशा श्लाेकांच्या मंत्रजागरात हजाराे महिला अाणि पुरुष भाविकांनी कालिका माता, भद्रकाली माता या ग्रामदेवतांचे दर्शन घेतले.
महानगरातील महिलावर्गाची पहाटेपासूनच लगबग सुरू झाली हाेती. घराेघरी पारंपरिक पद्धतीने घट बसवून, तेलाचा माेठा दिवा लावून रीतिरिवाजानुसार अारती करून देवीचे मनाेभावे पूजन करण्यात अाले. महापाैर अशाेक मुर्तडक यांनी शनिवारी सकाळी कालिका देवी मंदिरात सपत्नीक महापूजा केली. तसेच, अारतीतही माेठ्या उत्साहाने सहभाग नाेंदवला. त्याअाधी कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात अाली. कालिकामातेच्या पादुकांचे पूजन करून मातेचा जयघाेष करण्यात अाला. यावेळी कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, सचिव डाॅ. प्रताप काेठावळे, किशाेर काेठावळे, अाबा पवार, विजय पवार, दत्ता पाटील, सुरेंद्र काेठावळे, रामभाऊ पाटील, लता पाटील अादी उपस्थित हाेते. त्याअाधी सकाळी मंजूळ शहनाईच्या सुरात भूपाळी ते भैरवी या रागदारीतील चीजांचे सादरीकरण झाले. त्यानंतर शहरातील भजनी मंडळाने देवीचे पाठ अाणि स्ताेत्र घनगंभीर अावाजात म्हणत भक्तिमय वातावरणात भर घातली. पहिल्या माळेपासूनच भाविकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याने भाविकांसाठी सज्ज ठेवलेली सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात अाली अाहे.
यंदा दाेन दिवस प्रतिपदा असल्याने नवरात्राेत्सवाच्या दिवसांमध्ये एका दिवसाने वाढ झाली अाहे. कालिकामातेची माेठी यात्रा भरत असल्याने श्री कालिका मंदिर ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खासगी सुरक्षारक्षक नेमले हाेते. यंदा प्रथमच यात्रा मार्गावर फ्री वायफायचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली आहे. २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवले अाहे. केवळ रात्रीनंतर पहाटेपर्यंत मंदिराचा आतील गाभारा बंद ठेवण्यात येणार आहे. भाविक माेठ्या संख्येने जत्रेचाही अानंद लुटतात. त्यामुळे शनिवारीदेखील दर्शनाबराेबरच भाविकांनी जत्रेलादेखील गर्दी केल्याचे चित्र शनिवारी दिसून अाले.
बातम्या आणखी आहेत...