आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवाला चढला निवडणुकीचा फीव्हर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नवरात्रोत्सव अंतिम चरणात असून, महत्त्वाच्या सातव्या व आठव्या माळेची महाआरती आपल्याच हातून ओवाळली जावी, यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू झाली आहे. सहा महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपल्यामुळे इच्छुकांचे पायही उत्सव मंडपाकडे वळू लागले असून, आरतीच्यानिमित्ताने प्रचारही सुरू झाला आहे.

नवरात्र उत्सवाच्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक गरबाही खेळताना दिसत आहेत. आरतीसाठी कधी बोलवणार, असे विचारणारे लोकप्रतिनिधी वर्गणीसाठी खळखळ करताना दिसत आहेत. प्रभागात किमान 25 मंडळे असतात व किमान पाच हजारापासून पुढे वर्गणीचा आकडा मागितला जात असल्याने पैशांचे नियोजन करायचे कसे, असाही सवाल केला जात आहे.