आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीच्या उत्तरपर्वात दांडिया-गरब्याने रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवरात्राेत्सवाच्या अंतिम पर्वात शहरात ठिकठिकाणी सायंकाळनंतर रंगणाऱ्या रास दांडिया गरब्याने चांगलीच रंगत भरली आहे. विशेषत: तरुणाईच्या उत्साहाला बहर अाला अाहे.
रंगीबेरंगी चनिया चाेली, लहंगा अन्य पारंपरिक वस्त्र-प्रावरणे परिधान केलेल्या युवती गुजराती पद्धतीचा पाेषाख करून पायात माेजडी घातलेले युवक प्रत्येक दांडियात प्रचंड रंग भरू लागले अाहेत. गुजराथी गीते, मराठी गाणी उडत्या हिंदी गीतांच्या तालावर थिरकणारे तरुणाईचे पाय, त्यात गरब्याचा ताल काही ठिकाणी दांडियात घुमणारा टिपऱ्यांचा नाद सगळ्यांनाच अाकर्षित करून जात अाहे.

महिलांसाठीस्वतंत्र दांडिया : भद्रकालीतीलभाजी मार्केट परिसरात वावरे ग्रुपतर्फे महिलांसाठी स्वतंत्र दांडियाचे अायाेजन यंदापासून करण्यात अाले अाहे. या दांडियालादेखील जुने नाशिक परिसरातील महिला, युवतींकडून विशेष प्रतिसाद लाभत अाहे. केवळ महिलांसाठीचा दांडिया असल्याने येथे सुरक्षित वातावरणात गरबा, दांडिया खेळण्याचा अानंद लुटला जात अाहे.

नऊ नंतर बहरताहेत लॉन्स अन् मंडळे : गंगापूरराेडपरिसरात चाेपडा लाॅन्स, श्रद्धा लाॅन्स, तसेच नंदनवन लाॅन्स परिसरातील दांडिया रात्री नऊच्या नंतर अाेसंडून वाहत अाहेत. अखेरच्या टप्प्यानिमित्ताने दिलेल्या वाढीव वेळेचा तरुणाई मनमुराद अानंद लुटत अाहे. त्याशिवाय काठे गल्लीतील रवींद्र विद्यालयाच्या मैदानासह इंदिरानगर, राणेनगर परिसरातील दांडियांमध्येही तरुणाईची प्रचंड गर्दी दिसून येत अाहे. नाशिकराेड परिसरात दुर्गामाता देवस्थान, पाटीदार भवन, तसेच शिखरेवाडीतील बालाजी मंदिराजवळ बहरणाऱ्या दांडियात खेळण्यासाठी, तसेच दांडिया पाहण्याचा अानंद लुटण्यासही माेठी गर्दी हाेत अाहे. विविधठिकाणी हाेमहवन : नवरात्राेत्सवातील सप्तमी, अष्टमीच्या निमित्ताने विविध ठिकाणच्या अायाेजकांकडून हाेमहवन केले जात अाहे. त्यानंतर महापूजा, महाअारती प्रसादाचाही लाभ भाविकांना घेता येत अाहे. नवमीनिमित्त विविध ठिकाणी पूर्णाहुती साेहळ्याचेही अायाेजन करण्यात अाले अाहे.