आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडियासाठी अाजपासून रात्री १२ पर्यंत परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवरात्राेत्सवाचे पर्व अंतिम टप्प्याकडे सरकत असताना विविध मंडळांच्या दांडिया अन‌् गरब्यास हाेणारी अलाेट गर्दी दिवसागणिक वाढतच असल्याचे दृश्य साेमवारी कायम हाेते. दरम्यान, शासननिर्णयानुसार मंगळवार अाणि बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दांडिया सुरू ठेवता येणार असल्याने अखेरचे दाेन दिवस दांडियाप्रेमींच्या उत्साहाला पूर्ण उधाण येणार अाहे.

शहराच्या विविध भागांमध्ये रंगणाऱ्या रास दांडियाने या पर्वात रंगत अाली अाहे. त्यात अखेरच्या टप्प्यात दांडिया विशेष रंगत असल्याने दांडियाप्रेमी युवक-युवतींच्या उत्साहाला बहर अाला अाहे. त्यात पुढील दाेन दिवस रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी मिळाल्याने दांडियाच्या जल्लाेषात अधिक भर पडणार अाहे. गृहमंत्रालयाकडून वाढीव वेळेचा अादेश शनिवारी निघूनही ताे अादेश पाेलिसांना प्राप्त झाला नसल्याने अनेक ठिकाणी दहानंतरच दांडिया थांबवल्याने दांडिया प्रेमींचा हिरमाेड झाला हाेता.