आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रोत्सवाच्या स्वागताला आधुनिकतेचा साज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. शहराचे कुलदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात रोषणाई सभामंडपांच्या सजावटीचे काम वेगाने सुरू असून, शहराचे आकर्षण असलेला बंगाली बांधवांच्या गांधीनगर येथील दुर्गा महोत्सवाच्या तयारीलाही वेग आला आहे.

नवरात्र काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता मंदिरात आठ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पूर्वीचे १६ नवीन असे एकूण २४ कॅमेरे बसविण्यात आल्याने सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली असल्याचे कालिका देवी मंदिराचे विश्वस्त अण्णा पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, गांधीनगर परिसरातील बंगाली बांधवाचा नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार येथील मैदानावर सध्या दुर्गामातेची मूर्ती ठेवण्यासाठी स्वतंत्र सभागृह, तर रामलीलेसह इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठे सभागृह उभारण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे व्यत्यय होऊ नये, म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. येथील मूर्तीचे काम पेठरोडवरील भक्तिधाम परिसरात सुरू असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

गांधीनगर येथील मैदानावर बंगाली बांधवाच्या नवरात्रोत्सवासाठी दुर्गामातेची मूर्ती ठेवण्यासाठी स्वतंत्र सभागृह, तर रामलीलेसह इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठे सभागृह उभारण्याचे काम सुरू आहे. मंडपाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
मंदिर परिसरात साफसफाई आणि डागडुजीचे काम वेगाने सुरू आहे.
नाशिक शहराचे कुलदैवत कालिका देवी मंदिरात कोरियन पद्धतीचे सिलिंगदेखील करण्यात आले आहे. याला सोनेरी रंग देण्यात येऊन त्यावर एलईडी लाइट‌्स सोडल्या आहेत.
कालिका माता मंदिराच्या दर्शनी भागावर तसेच मुख्य कमानीवरदेखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
कालिका माता मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम करताना कारागीर.
मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, सर्व हालचालींवर नजर ठेवण्याचे काम या कॅमेऱ्यांद्वारे केले जाणार आहे.