आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुच दुर्गा, तू भवानी, संसाराची तू गं जननी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - कधीती भवानी होते, तर कधी दुर्गा, कधी आदि.माया अंबाबाई, तर कधी रेणुका माउली. अशा विविध रूपात ती रक्षणकर्ती होते. शक्ती, बुद्धी, धन, समाधान देणारी अशी माता नवरात्रीचा सोहळा घेऊन भक्तांच्या दर्शनाला येत्या काही दिवासांतच येते आहे. िठकठिकाणी तिचे मनोहारी रूप विराजमान होणार आहेत.
तुच दुर्गा, तू भवानी।
संसाराची तुच जननी।
आदिमाया तुझी
अंबे किरपा करी ।।
तिच्या विविध रूपातील मुद्रा अनेक मूर्तिकारांकडे सध्या भक्तांच्या मंडळात वा घरी विराजमान होण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यात सप्तशृंगी देवी, रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजाभवानी या रूपातील मूर्तीही यंदाचे खास आकर्षण ठरत आहेत. कच्चा मालाच्या भावात वाढ झाल्याने गेल्यावर्षीपेक्षा २० ते ३० टक्के किमतीने मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. घरगुती आराससाठी साधारणत: १००० ते १२०० रुपयांपर्यत तर सार्वजनिक मंडळासाठी मोठ्या आकाराच्या ५००० ते ७५०० रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती अहमदनगर येथून नािशकमध्ये विक्रीसाठी येतात. साधारणत: लहानात लहान मूर्ती ही सहा किलाेची असते. मात्र, तिच्या आकाराप्रमाणे अर्थातच वजन वाढत जाते. नािशकमध्ये येथून दरवर्षी साधारणत: तीस ते चाळीस मूर्तींची विक्री होते.
शहरातील काठेगल्ली सिग्नल परसिरात मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटलेली आहेत. लहान मूर्ती खरेदी करण्यासाठी महिलांची तर मोठ्या मूर्तींसाठी मित्रमंडळांचे कार्यकर्ते सध्या या परसिरात गर्दी करत आहेत.