आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: घराेघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवच्या पर्वाला प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुरुवारी (दि. २१) अश्विन शुद्ध प्रतिपदेला घराेघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सव आणि स्त्री शक्तीच्या पूजनाची सुरुवात झाली. 
 
घरोघरी कुळाचाराप्रमाणे आणि देवीच्या देवळांमध्ये भक्तिपूर्वक घटस्थापना केली गेली. काही ठिकाणी प्रत्यक्ष घटाची स्थापना असते, तर काही ठिकाणी अष्टभूजा देवीच्या मूर्तीची स्थापना केली गेली. या नऊ दिवसांत केवळ फलाहार, मौनव्रत, सप्तशतीचा पाठ असे अनेक आचार-नियम पाळले जातात. विविध शास्त्रोक्त कार्यक्रमांचे आयोजनही या दरम्यान केले जाणार आहे. 
 
कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला पहाटे पाच वाजता प्रारंभ झाला. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते मंत्राेच्चारात विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्री कालिकेची षोडशोपचारे पूजा करून आरती करण्यात आली. कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, सचिव डाॅ. प्रताप कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सुरेंद्र कोठावळे, किशोर कोठावळे, आबा पवार, विजय पवार, संतोष कोठावळे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...