आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी कार्यकारिणीचा ‘नवा चेहरा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तब्बल दोन महिन्यांच्या विलंबानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शहर कार्यकारिणीचा विस्तार केला असून, 70 टक्के नवीन चेहर्‍यांचा समावेश असलेली आणि माजी नगरसेवकांचे पुनर्वसन करणारी ही कार्यकारिणी असल्याचे शहराध्यक्ष शरद कोशिरे आणि आमदार जयवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पडल्या. निवडणूक निरीक्षक अशोक बाबर यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती देऊन कोशिरे म्हणाले, या कार्यकारिणीत जुने व नवीन कार्यकर्ते यांचा मेळ घालण्यात आला असून, निष्कलंक पदाधिकारी दिल्याचाही दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीत अन्य पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते येण्यास इच्छुक असून, लवकरच त्यांचा प्रवेश सोहळा होईल. तसेच यापुढे पक्षाला बळकट करण्यासाठी मिशन विधानसभा 2014 डोळ्यासमोर ठेवून प्रभागनिहाय बैठका व मेळावे घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकारिणीत प्रामुख्याने माजी नगरसेवक अरुण काळे, रुक्मिणी कर्डक, प्रतिभा पवार, मनोहर बोराडे, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सीमा कदम, देवांग जानी, संजय माधवराव पाटील, संतोष कमोद, दिनेश कमोद, वैभव खैरे यांचा समावेश आहे. नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी अशोक पाटील-मोगल, मध्य अध्यक्षपदी संजय दाजी खैरनार व पश्चिम अध्यक्षपदी यादवराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहा ब्लॉक अध्यक्षही नेमण्यात आले आहेत. माहिती अधिकार प्रमुख पदावर अनिल बन्सीलाल परदेशी व मिलिंद हरिश्चंद्र येवलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसे ठरली अपयशी - महापालिकेत सत्ता मिळविल्यानंतर मनसेला गोदावरीतील पाणवेली काढण्यातही अपयश आले, असा आरोप कोशिरे यांनी केला. कुंभमेळ्याचे नियोजन कसे होईल याविषयी चिंता व्यक्त करीत अस्वच्छता व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी आता आंदोलन हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 50 हजार झाडे लावण्याचा संकल्पही त्यांनी केला.
प्रदेश सदस्य असे - खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, नानासाहेब महाले, माधवराव पाटील, भगवान बिडवे, रंजन ठाकरे, प्रकाश मते, निवृत्ती अरिंगळे, अँड. विजय कातोरे, निजाम कोकणी.
असे आहेत पदाधिकारी - उपाध्यक्ष 12, सरचिटणीस 12, चिटणीस 10, खजिनदार 1, पक्षसंघटक 4, माहिती अधिकार प्रमुख 2, कार्यालय चिटणीस 1, विधानसभा अध्यक्ष 3, सहा ब्लॉक अध्यक्ष, 61 प्रभाग अध्यक्ष.