आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी सामन्यातही दिसतील नाशिकचे खेळाडू शरद पवार यांना विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशाच्या ग्रामीण भागातून माेठमाेठे खेळाडू निर्माण हाेऊ लागले असून, भविष्यात नाशकातूनही कसाेटी खेळणारे खेळाडू निर्माण हाेतील, असा विश्वास अायसीसीचे माजी अध्यक्ष अाणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हा क्रिकेट असाेसिएशनच्या नूतनीकृत कार्यालयासह धैर्यशीलराजे पवार अाणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या क्रिकेट वेशातील छायाचित्राचे अाणि बाॅलिंग मशीनचे अनावरण केल्यानंतर ते बाेलत हाेते.
येथील गाेल्फ क्लब मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात अामदार छगन भुजबळ, महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के, सचिव शानबाग, विनायकदादा पाटील, अामदार सीमा हिरे, अायुक्त प्रवीण गेडाम, विठ्ठल मणियार, समीर रकटे अादी मान्यवर उपस्थित हाेते. या वेळी बाेलताना पवार यांनी ते प्रथमच अामदार झाल्यानंतरच्या काळात दिल्लीत गेल्यावर सुरगाण्याचे राजे अाणि तत्कालीन राज्यसभा खासदार धैर्यशीलराव पवार यांच्याशी जुळलेल्या स्नेहाचे किस्से सांगितले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला जिल्हा पातळीपर्यंत मजबूत करून अामूलाग्र बदल करण्याचे श्रेय अजय शिर्के यांचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. क्रिकेटचा खेळ हा देशाचा धर्म बनलेला असून, सगळ्यांना त्यातून अानंद मिळताे, असेही पवार यांनी नमूद केले.
िक्रकेट ही भारतातील सगळ्यात स्वस्त करमणूक असून, त्यातून अमर्याद अानंद सामान्य नागरिकांना मिळत असल्याचे विनायकदादा पाटील यांनी सांगितले. तसेच या छायाचित्रामागील इतिहासदेखील विनायकदादांनी सांगितला. या वेळी हे छायाचित्र त्यांच्या संग्रहातून उपलब्ध करून दिल्याबद्दल विनायकदादा पाटील यांचेही अाभार मानण्यात अाले. कार्यालय नूतनीकरणात साहाय्य करणारे दिनेश पटेल, बाॅलिंग मशीन पुरवणारे गाेल्डी अानंद तसेच उगवते क्रिकेटपटू मुर्तजा ट्रंकवाला अाणि सत्यजित बच्छाव यांचा विशेष सत्कार करण्यात अाला.
नेहरूंनाही बांधायला लावले त्यांनीे पॅड
धैर्यशीलराव राज्यसभेचे खासदार असताना प्राइम मिनिस्टर्स प्रीमिअर लीग खेळवून त्यात नेहरू यांना पॅड बांधून खेळायला उतरवण्याचे श्रेयदेखील त्यांचेच अाहे. राज्यसभेच्या संघाकडून फलंदाजीस जेव्हा सलामीचे फलंदाज उतरले तेव्हा त्यातील एक फलंदाज हाेते धैर्यशीलराव पवार अाणि दुसरे फलंदाज हाेते नेहरू. ताेच क्षण या छायाचित्रातून समाेर अाला.असून, ते छायाचित्र सर्व पदाधिकाऱ्यांना अाणि उभरत्या क्रिकेटपटूंना प्रेरणा देत राहील, असेही शरद पवार यांनी सांगितले.
एनडीसीएच्या नवीन कक्षाचे उद‌्घाटन करताना शरद पवार. या वेळी धैर्यशील पवार यांच्या संग्रहातील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद‌्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी छगन भुजबळ उपस्थित होते.