आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशवारीच्या विक्रमात मोदींचे आधुनिक शेतीकडे दुर्लक्ष- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहा महिन्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी परदेशात जाण्याचा विक्रम केला. परदेशात जाऊन संबंध वाढवणे गैर नाही. मात्र, विदेशातील शेतीबाबतचे अाधुनिक तंत्रज्ञान भारतातही अाणण्याची त्यांची भूमिका दिसत नसल्याचा सणसणीत अाराेप राष्ट्रवादी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला. भाजप सरकारच्या प्राधान्यक्रमात शेतीचा संबंधच नसल्याचा टाेला लावत त्यांच्या अजेंड्यावर वेगळेच काहीतरी असल्याचा संशयही निर्माण झाल्याची पुस्ती पवार यांनी जाेडली.
नाशिक दाैऱ्यावर अालेल्या पवार यांनी िजल्ह्यातील द्राक्ष, कांदा, डाळिंब अन्य नुकसानग्रस्त पिकांचा पदाधिकाऱ्यांकडून अाढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र राज्यातील भाजप सरकारवर तसेच माेदींवर हल्लाबाेल केला. ते म्हणाले की, अवकाळी पाऊस गारपिटीचे वारंवार संकट येत अाहे. अशा परिस्थितीत सरकार म्हणून शेतकऱ्यांना िदलासा देण्याची सरकारची भूमिका नसल्याचे दिसते. मी सांगितल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नाशिक दाैरा केला. वास्तविक नुकसानाची पाहणी करून मदत जाहीर करण्यासाठी केंद्राची एक समिती अाहे. नऊ वर्षे या समितीचे अध्यक्षपद माझ्याकडे हाेते. अाता या समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मध्यंतरी बैठक झाली. मात्र, ठाेस नुकसानभरपाई वा मदतीची मात्र घाेेषणाच झाली नसल्याचा टाेलाही लगावला. संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच जाब विचारेल, असेही त्यांनी सांगितले.

शेतीकडे दुर्लक्ष हाेत असल्यावरून भाजपचे कान उपटणाऱ्या पवार यांनी जैतापूर अाैष्णिक विजेसंदर्भातील करारप्रकरणी मात्र माेदी यांना समर्थन दिले. त्यासंदर्भात पवार म्हणाले अाैष्णिक वीज ही स्वस्त पर्यावरणाला बाधक नाही. त्याचा महाराष्ट्राला फायदा हाेईल, असाही दावा त्यांनी केला. नवीन प्रकल्पांची घाेषणा झाली की, कृती समिती तयार हाेऊन विराेध सुरू हाेताे. शिवसेना केंद्र राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजपने त्यांची समजूत काढली पाहिजे, असा चिमटा काढताना शिवसेनेने सहन हाेत नसेल, तर सत्ता साेडावी असा टाेलाही त्यांनी लगावला. शेतकरीविराेधात वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही कानपिचक्या दिल्या.