आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसमध्ये विसंवादाने संभ्रमात भर

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सत्तेचे समीकरण जुळविण्यासाठी सर्वांचीच लगीनघाई सुरू असताना सत्तेसाठी दावेदारी करणा-या आघाडीमधील राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसमध्येच विसंवाद निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांसह दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे कॉँग्रेसकडून मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नसली तरी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले आहे, तर आकाश छाजेड यांनी मात्र कॉँग्रेसचाच महापौर असेल, असा दावा केला आहे.
राष्ट्रवादीकडून कोणता प्रस्ताव येईल, यावरच आमची भूमिका अवलंबून असेल, असेही छाजेड यांनी सांगितले आहे. यामुळे आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांमध्येच विसंवाद निर्माण झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. सेनेला घेऊन पुणे पॅटर्न राबविण्याबाबत बोलले जात असताना दुसरीकडे कॉँग्रेसने मात्र शिवसेनेला विरोध दर्शविल्याने सत्तेचे समीकरण गुंतागुंतीचे झाले असून, निकालानंतर आठवडा होत आला तरी महापौरपदाचे चित्र स्पष्ट झालेले नाही.