आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची माेर्चाकडे पाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भुजबळयांच्या समर्थकांचा माेर्चा नाशिक शहरातून काढण्यात अाला खरा, परंतु एकेकाळी त्यांचे कट्टर समर्थक म्हणवून घेणाऱ्या अनेकांनी माेर्चात उपस्थितीही दर्शविली नाही. काहींनी माेर्चात सहभाग घेता थेट शासकीय विश्रामगृह गाठले. महापालिकेत राष्ट्रवादीचे तब्बल २० नगरसेवक असताना प्रत्यक्षात माेर्चात चार ते पाच नगरसेवकांनीच हजेरी लावली. अागामी निवडणुकीतील राजकीय समीकरणे जुळविण्यासाठीच गैरहजेरीचा फंडा वापरण्यात अाल्याचे बाेलले जात अाहे.
काही महिन्यांपूर्वी भुजबळ यांचे समर्थक म्हणवून घेण्यात अनेक नेत्यांना स्वारस्य हाेते. भुजबळ यांच्या पुढे-मागे फिरण्यातच ही मंडळी धन्यता मानत हाेती. परंतु, ‘ईडी’च्या कारवाईनंतर अनेकांनी भुजबळ फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिरकणेही बंद केल्याचे सांगितले जाते. भुजबळ समर्थकांच्या माेर्चात याची प्रकर्षाने प्रचिती अाली. त्यात भुजबळ यांचे एकेकाळच्या कट्टर समर्थकांचा समावेश अाहे. माेर्चाच्या पार्श्वभागी राजकीय मंडळी उपस्थित हाेती, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात बाेटावर माेजण्याइतके पदाधिकारीच पार्श्वभागी हाेते.
यांचासहभाग : माजीमंत्री तुकाराम दिघाेळे, जि. प. अध्यक्षा विजयश्री चुंभळे, अामदार जयवंत जाधव, डाॅ. भारती पवार, उपमहापाैर गुरुमित बग्गा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष सुनीता निमसे, दिलीप खैरे, अंबादास खैरे, नगरसेविका कविता कर्डक, रंजना पवार, वैशाली दाणी, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, सचिन महाजन, बाळासाहेब गाढवे, सुजाता वाजे, सुनील वाजे, वंदना चाळीसगावकर,अर्जुन टिळे, नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काेंडाजी अाव्हाड, राधाकिसन साेनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, हनिफ बशीर, मनाेहर बाेराडे, बाळासाहेब कर्डक, रत्नाकर चुंभळे, कैलास मुदलियार, छबू नागरे, उदय सांगळे, हिरामण खाेसकर अादी.

अवमान हाेऊ नये म्हणून...
माेर्चा अाेबीसींच्या मागण्यांसाठी असता तर अाम्ही सहभागी झालाे असताे, असे अनेक राजकीय नेत्यांनी सांगितले. भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असताना त्यांचे समर्थन करणे ही बाब न्यायालयाचा अवमान ठरू शकते, असेही काहींनी सांगितले.
मराठा समाजाच्या माेर्चात सहभागी हाेण्यासाठी अनेक लाेकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला हाेता. यात मराठा समाजासह अन्य समाजाच्या नगरसेवकांचाही समावेश हाेता. मात्र, भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात अालेल्या या माेर्चात संबंधितांनी गैरहजर राहणेच पसंत केले. या माेर्चात सहभागी झाल्यास मराठा समाजाची नाराजी अाेढावली जाईल, अशी भीती संबंधितांमध्ये हाेती. शिवाय, साेशल मीडियावरदेखील अशाच प्रकारचे इशारे दिले जात हाेते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची काेंडी झाली. माेर्चाला उपस्थिती दर्शविली तर मराठा समाजाची नाराजी अाणि गैरहजर राहिलाे तर अाेबीसी समाजाची नाराजी अशा व्दिधा मन:स्थितीत संबंधित लाेकप्रतिनिधी मंगळवारी दिवसभर हाेते.
बातम्या आणखी आहेत...