आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छबू नागरे यांना अटक व सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महिला पोलिस अधिकार्‍यास दमदाटी करून अंबड पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे यांना अंबड पोलिसांनी गुरुवारी अटक केली. संशयित नागरेंना न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अद्वय हिरे यांनी पालकमंत्री भुजबळांविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला होता. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी हिरेंच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या गुन्ह्यात अटकेतील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी नागरे दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात गेले असता तेथे महिला अधिकारी धनर्शी पाटील यांना त्यांनी दम दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता.