आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader Chagan Bhujbal Property News In Marathi

धनवान : छगन भुजबळांची संपत्ती दहा वर्षांत दसपटीने वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप करून राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांची मालमत्ता 2663 कोटी असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात 2004 ते 2014 या काळात भुजबळ यांनी आपली मालमत्ता 1 कोटी 91 लाखांहून 21 कोटीपर्यंत वाढल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केले. 2009 विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांची मालमत्ता 7 कोटी 75 लाख होती. मागील पाच वर्षांचा विचार केला तर त्यात 13 कोटींची वाढ झाली आहे.
2004 मध्ये भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढविली. त्या वेळी दिलेल्या शपथपत्रात स्वत: व पत्नी मीनाताई यांच्या नावावर जवळपास 1 कोटी 91 लाखांची संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते. भुजबळांकडे त्या वेळी एकही वाहन नव्हते.
नाशिकच्या शिलापूरजवळ 24 लाख 97 हजार रुपयांची शेती त्यांच्या, तर पत्नीच्या नावावर 3 लाख 29 हजार रुपयांची जमीन होती. हेमराज सोसायटीत 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा फ्लॅट होता. याव्यतिरिक्त मुंबईतील दोन फ्लॅट मिळून 87 लाख 16 हजार रुपयांची मालमत्ताही होती. 2004 मध्ये भुजबळ यांच्याकडे 5 लाख 55 हजार रुपयांचे सोने होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते.
2014 च्या शपथपत्रातील माहितीनुसार, भुजबळांच्या नावे 8 लाख तर पत्नीच्या नावे 24 लाखांचे कर्ज आहे. सध्या भुजबळांकडे 2 लाख 87 हजार रुपयांचा ट्रॅक्टर तर पत्नीच्या नावावर 5 लाख 85 हजार रुपये किमतीचे टाटा पिकअप वाहन आहे. 2004 मध्ये त्यांच्याकडे 5 लाख रुपयांचे सोने होते. आजघडीला पत्नीकडे 35 लाख तर स्वत: भुजबळ यांच्याकडे 16.55 लाखांचे सोने आहे.
संपत्ती
2004 - 1.91 कोटी
2009 - 7.75 कोटी
2014 - 21 कोटी
मुंबईतही प्रॉपर्टी खरेदी
मागील दहा वर्षांच्या काळात मुंबईतील नवीन मालमत्ता खरेदी करण्यात आली. नवी, मुंबई, दादर, चर्चगेट, भायखळा, वाशी बाजार समिती, आंबेवाडी अशा विविध भागातील मालमत्ता मिळून जवळपास 20 कोटी रुपयांची मालमत्ता भुजबळ दांपत्याच्या नावावर आहे.