आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांच्या समर्थकांचे भाजपविरोधात शक्तिप्रदर्शन, नाशिकमध्ये भव्य माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सात महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी मंत्री तथा अाेबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी लाखाे समर्थकांनी साेमवारी भरपावसात तपाेवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असे जवळपास सहा किमी अंतर कापत विराट मूकमाेर्चा काढला. भुजबळ यांना समर्थन देतानाच भाजप सरकारविराेधात जाेरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही लपून राहिला नाही. विशेष म्हणजे या माेर्चासाठी राज्यभरातून भुजबळ व अाेबीसी समर्थकांची लक्षणीय गर्दी झाली हाेती. दाेन अाठवड्यांपूर्वी झालेल्या मराठा समाजाच्या माेर्चाप्रमाणे या अांदाेलनाचीही अत्यंत शिस्तबद्ध, शांतता व संयम राखून दाेन तासांत सांगता झाली.

गेल्या दाेन अाठवड्यापासून भुजबळ यांच्या समर्थनासाठी मूकमाेर्चा काढण्यासाठी तयारी सुरू हाेती. सुुरुवातीला माळी समाजापुरता मर्यादित असलेल्या या माेर्चाचे रूपांतर भुजबळ समर्थक या झेंड्याखाली करून देशभरातील समर्थकांना हाक देण्यात अाली. अायाेजकांच्या हाकेला अाे देत लाखाे समर्थकांनी प्रतिसाद दिला. साेमवारी दुपारी १२.४५ वाजता तपाेवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळून माेर्चाला सुरुवात झाली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. कधी जाेरात तर कधी हलक्या सरींचा वर्षाव सुरू असताना भुजबळ समर्थकांनी माेर्चामधून अापल्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेच्या मार्गाने हा माेर्चा तपोवन येथून चव्हाण मळा, आठवण लॉन्समार्गे तपोवन कॉर्नर, आइस फॅक्टरी, काट्या मारुती मंदिर, जुना आडगाव नाका, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बसस्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे अाला. दुपारी २.३० वाजता जिल्हा परिषद स्टेडियमजवळ अायाेजकांच्या वतीने बाळासाहेब कर्डक यांनी प्रास्ताविक सुरू केले.

तिकडे, विविध जाती धर्मातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात अाले. शिष्टमंडळात जी.जी.चव्हाण, मधुकरराव जेजूरकर, अॅड.जालिंदर ताडगे, मीरमुक्तार अश्रफी, हाजी शौकत शहा, चंद्रकांत कन्सारा, ज्ञानेश्वर शेवाळे, वसंत दगडू दुकळे, सुगंधा टोपले,अशोक सूर्यवंशी, मुक्ताबाई मोटकरी, मनोहर कोरडे यांचा समावेश हाेता. अाेबीसीबराेबरच अन्य समाजातील जनसमुदायही सहभागी झाला हाेता.

निवेदनातील मागण्या
- शोषित-पीडित, वंचितांसाठी सतत लढा देणाऱ्या छगन भुजबळांवर राजकीय आकसापोटी कारवाई केली जात आहे. त्यांची व समीर यांची त्वरित सुटका करावी.
- काही हितशत्रंूनी आकस, राजकीय वैमनस्यातून बनावट व खोटे साक्षीदार उभे करून तपास यंत्रणांना चुकीची माहिती दिली अाहे. ही सर्व माहिती खोटी अाहे.
- भुजबळांकडून चौकशीला संपूर्ण सहकार्य केले जात असतानाही त्यांना अटक केली आहे. हा अन्याय अाहे.
- मराठा व अन्य समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसींंच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.
हाेर्डिंग्ज, बॅनरमधूनही अाेबीसींची एकजूट
भुजबळ यांच्या समर्थनासाठी माेर्चा काढल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अाेबीसी समाजाला संघटित करून त्या माध्यमातून अापलीही ताकद दाखवण्याचा प्रयत्न लपून राहिला नाही. खास करून, िवधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र अाव्हाड यांच्या प्रतिक्रिया तसेच लागलेले हाेर्डिंग्ज, बॅनरमधूनही हाच संदेश प्रतीत हाेत हाेता. गर्दीचा अाकडा पाच ते २५ लाखांपर्यंत अंदाज

भुजबळ समर्थक मूकमाेर्चासाठी
या अांदाेलनासाठी देशभरातून २५ लाख समर्थक अाल्याचा दावा संयाेजक समितीचे सदस्य दिलीप खैरे यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे व माजी मंत्री जितेंद्र अाव्हाड यांनी १५ लाख माेर्चेकरी असल्याचा अंदाज व्यक्त केला. पाेलिस सूत्रांच्यामते हा अाकडा सुमारे पाच लाखांपर्यंत असू शकताे.

अांदाेलकांचे अाता ‘मिशन बीड’
भुजबळ समर्थकांचा माेर्चा नाशिकपुरताच मर्यादित असल्याचे चित्र असताना अांदाेलनाच्या सांगतेप्रसंगी अायाेजकांनी २० अाॅक्टाेबरला अाता बीड येथे भुजबळ समर्थकांचा माेर्चा निघणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे मूळ बीडचे असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे याबाबत पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले. अायाेजकांनी काही ठरवले असेल तर त्यांच्याशी चर्चा करून बीड येथेही उत्साहात माेर्चा पार पाडू अशी सारवासारव त्यांना करावी लागली.

पुढील स्लाइडवर वाचा, पवारांनी लावली टाच...
बातम्या आणखी आहेत...