आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी-मनसेची छुपी युती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्याअनेक िदवसांपासून गाजत असलेला साधुग्रामच्या सफाईचा वादग्रस्त ठेका निविदा प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठेकेदाराला देण्यामागे मनसे राष्ट्रवादीची छुपी युतीच कारणीभूत असल्याचा अाराेप करीत शिवसेना महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अद्यापही मनसेचा रिमाेट कंट्राेल असल्याचा दावादेखील केला.
सर्वात कमी दराचा, परंतु ३५ टक्के जादा दराने काम घेणाऱ्या वाॅटरग्रेस प्राॅडक्ट्स या कंपनीचा ठेका स्थायी समितीने मंजूर केला. मात्र, संबंधित कंपनीकडे ९५ लाखांंची थकबाकी असल्याचा अहवाल बघून स्थायीने दुसऱ्या क्रमांकावरील ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, क्रिस्टल कंपनीकडे ठेका देण्याच्या हालचाली सुरू असून, त्यास शिवसेनेने अाक्षेप घेत या वादात उडी घेतली. बाेरस्ते म्हणाले की, क्रिस्टल कंपनी राष्ट्रवादीशी संबंधित असून, कंपनीच्या पदाधिकाऱ्याने ‘म्हाडा’चे उच्चस्तरीयपद भूषवले अाहे. भुजबळ फार्म, एमईटीपासून तर राष्ट्रवादी भवनापर्यंतच्या स्वच्छतेचे कंत्राटही याच कंपनीकडे असून, राष्ट्रवादीचे ‘लाड’ पुरवण्यासाठी मनसेने पहिल्या क्रमांकावरील ठेकेदाराला बाद करण्यास मदत केल्याचा संशय अाहे. अद्यापही भुजबळांच्या इशाऱ्यावरच मनसे काम करीत असल्याचे चित्र अाहे. दाेन्ही ठेकेदारांची कंत्राटे रद्द करून मानधनावर स्थानिक तरुणांना राेजगार द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

प्रस्ताव पाठवलाच कसा
जैविककचऱ्याची ९५ लाख रुपयांच थकबाकी हाेती, हे माहीत असूनही अायुक्तांनी स्थायी समितीवर प्रस्ताव पाठवलाच कसा, असा सवालही बाेरस्ते यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...