आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत जाणा-यांनी राजीनामे द्यावेत - मोहन शेलार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदावर मोहन शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सचिनं पिंगळे यांनी शेलार यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन टिळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शोभा मगर हे या वेळी उपस्थित होते. शेलार यापूर्वी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष म्हणून कामकाज बघत होते. तालुक्यातील 38 गाव नळपाणीपुरवठा योजना समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

स्वाभिमान असेल तर पदभार सोडा!
गेल्या आठवड्यात मातोश्री दरबारी शिवसेनेत प्रवेश करणा-या येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी व लोकप्रतिनिधींनी स्वाभिमान असेल, तर प्रथम राष्ट्रवादीच्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी केली आहे. पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी गेल्या आठवड्यात आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांनी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे ते येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे.